JEE Advanced 2021: ऑल इंडिया टॉपर मृदूल अग्रवालने 360 पैकी 348 गुण मिळवत रचला नवा इतिहास

मुंबई तक

• 07:23 AM • 15 Oct 2021

जेईई या परीक्षेत भारतात टॉप केलेल्या मृदूल अग्रवालने इतिहास घडवला आहे. जेईई Advanced मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक गुण त्याने मिळवले आहेत. मृदूल अग्रवालला 360 पैकी 348 गुण मिळाले आहेत. एलन करिअर इन्स्टिट्युटचा विद्यार्थी मृदूल अग्रवाल याला या परीक्षेत 96.66 टक्के गुण मिळाले आहेत. याआधी मृदूलने जेईई मेन्समध्ये टॉप केलं होतं. मृदूल अग्रवालने JEE Advanced मध्ये अव्वल […]

Mumbaitak
follow google news

जेईई या परीक्षेत भारतात टॉप केलेल्या मृदूल अग्रवालने इतिहास घडवला आहे. जेईई Advanced मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक गुण त्याने मिळवले आहेत. मृदूल अग्रवालला 360 पैकी 348 गुण मिळाले आहेत. एलन करिअर इन्स्टिट्युटचा विद्यार्थी मृदूल अग्रवाल याला या परीक्षेत 96.66 टक्के गुण मिळाले आहेत. याआधी मृदूलने जेईई मेन्समध्ये टॉप केलं होतं.

हे वाचलं का?

मृदूल अग्रवालने JEE Advanced मध्ये अव्वल आला आहे. आता मुंबईतल्या IIT ठिकाणी प्रवेश घेऊन कॉम्प्युटर सायन्स हा विषय घेऊन शिकायचं आहे असं मृदूलने म्हटलं आहे. भविष्यात आपलं स्टार्ट अप सुरू करण्याचाही त्याचा मानस आहे. मृदूल अग्रवाल हा मुळचा जयपूरचा आहे. त्याचे वडील प्रदीप अग्रवाल हे एका प्रायव्हेट फर्ममध्ये अकाऊंट्स मॅनेजर म्हणून काम करतात तर त्याची आई पूजा अग्रवाल या गृहिणी आहेत. संपूर्ण वर्षभर या परीक्षेसाठी मी तयारी करत होतो. या काळात मला माझ्या शिक्षकांची चांगली साथ आणि आईकडून अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं गेलं असंही मृदूलने सांगितलं आहे.

JEE Advanced चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला जे विद्यार्थी बसले होते ते आपला निकाल jeeadv.ac.in या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात. JEE Advanced चा रोल नंबर आणि आपली जन्मतारीख हे लिहून त्यांना लॉग इन करता येईल आणि आपला निकाल पाहता येईल.

JEE Advanced चा निकाल आज सकाळी जाहीर झाला आहे. या निकालादरम्यान IIT खडगपूर सहीत ऑल इंडिया टॉपर्सची लिस्टही वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. IIT प्रवेश परीक्षा 3 ऑक्टोबरला घेण्यात आली होती. या परीक्षेत जयपूरचा मृदूल अग्रवाल देशात पहिला आला आहे.

JEE Advanced मध्ये ऑल इंडिया प्रथम क्रमांक मिळवणारा मृदूल याआधी जेईई मेन परीक्षेतही 100 पर्सेन्टाईलसह टॉपमध्येच होता. जेईई मेनमध्ये मृदूलने 300 पैकी 300 गुण मिळवले होते. आता JEE Advanced या परीक्षेतही तो पहिला आला आहे. दहावीच्या परीक्षेत मृदूलला 98.2 तर बारावीच्या परीक्षेत त्याला 98.66 टक्के गुण मिळाले होते.

    follow whatsapp