भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई तक

• 11:50 AM • 04 Feb 2022

भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग भाजप आमदार नितेश राणे यांची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र कोर्टाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काय काय घडलं? नितेश राणे यांना कडेकोट बंदोबस्तात सावंतवाडीत ठाण्यात आणण्यात आले. तिथून मग त्यांना […]

Mumbaitak
follow google news

भरत केसरकर, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग

हे वाचलं का?

भाजप आमदार नितेश राणे यांची पोलीस कोठडी आज संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कोर्टाकडे पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र कोर्टाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

काय काय घडलं?

नितेश राणे यांना कडेकोट बंदोबस्तात सावंतवाडीत ठाण्यात आणण्यात आले. तिथून मग त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं तर दोन रात्र त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात काढली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यातच तिथे जवळपास त्यांची साडेपाच तास चौकशी झाली झाली होती. यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं.

पहिल्या वेळेस युक्तिवाद झाला त्यात सरकारी वकीलांतर्फे हे वारंवार सांगितले जात होते की राकेश परब यांच्या मोबाईलवर नितेश राणे यांचं आरोपींची मुख्य आरोपी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यामुळे राकेश परब व नितेश राणे यांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे. ज्यानंतर अनेकदा राकेश परब यांना कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. गुरूवारी संध्याकाळी नितेश राणे यांना गोव्यात त्यांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्या हॉटेलचे आणि संतोष प्रकरण आहे त्याचं नेमकं काय कनेक्शन आहे? याचा तपास करण्यात आला.

जेव्हा अटकपूर्व जामिनासाठी आदल्या रात्रीपर्यंत नितेश वकिलामार्फत जिल्हा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात अर्ज करत होते. त्यावेळेस ते अज्ञातवासात होते. त्यावेळेस तिथे अर्थातच गोव्यातील त्यांच्या हॉटेलात मुक्कामाला होता का?असे अनेक मुद्दे होते. या अनुषंगाने तपास झाला. त्यासंदर्भातली चौकशी झाली. जवळपास सव्वा दोन तास चौकशी केल्यानंतर गुरूवारी रात्री त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणले गेले.

सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी पोलीस स्टेशनमधून बाहेर आणून कणकवलीत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या पोलीस ठाण्यातही त्यांची चौकशी झाली होती. यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली. पण आज राकेश परब यांची पोलीस कोठडी संपते आहे. त्यामुळे नितेश राणे आणि राकेश परब यांच्या पोलीस कोठडीत संपली. आता ते न्यायालयीन कोठडी झाल्याने जामिनासाठी मागणी करू शकतात. पण विशेष सरकारी वकील प्रदीप घरात हे जोरदार युक्तिवाद करण्यात आला की अजून तपास बाकी आहे, आम्हाला तपास करायचा आहे. पुण्याला जाऊन तपास करायचा आहे आणि काही फायनान्स ट्रान्सफर झाली आहे हे आम्हाला तपासामध्ये बघायचे आहे. आम्हाला त्याची माहिती घ्यायची आहे. तसेच नितेश राणे यांनी जो फोटो पाठवला ते आता मान्य करत नाहीत.

याबाबत अधिक तपास करायचा आहे असे अनेक मुद्दे सरकारी वकील यांनी मांडले होते. तसंच आठ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आलेली होती. प्रदीप घरत या ठिकाणी ही मागणी करत होते. यापूर्वी जी सुनावणी झाली त्यात दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली होती. पोलिसांचं म्हणणं होतं की आम्हाला समोरा समोर बसवून चौकशी करायची आणि तपासात अनेक बाबी उलगडायचे आहेत. त्यामुळे वारंवार दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली जात होती पण दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी मान्य केली होती आणि त्यानंतर नितेश राणे यांचा दोन दिवस चौकशीला सामोरे जावे लागले होते.

यापूर्वी जेव्हा त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब पोलिसांना शरण आले होते. त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी होती. एडवोकेट प्रदीप घरत यांनी नितेश राणे यांची दहा दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला की तुम्ही नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यामध्ये कुठल्याही तपास झालेला झालेला नाही. यापुढे आता पोलीस कोठडीची मागणी आम्हाला मान्य नाही. अशा प्रकारचा युक्तिवाद झाला. प्रदीप घरत आणि पोलिसांकडून आठ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. या आधी जर आपण गेल्या सव्वा महिन्यात बघितला तर या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ते सर्व आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे या सगळ्या युक्तिवादाचा आणि एकूणच तपासाचा मुद्दा लक्षात घेऊन न्यायालयाने नितेश राणे आणि राकेश परब त्यांच्या एकूण आठ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली आणि नितेश राणे राकेश परब यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ते नियमित जामीनासाठी अर्ज करू शकतात.

    follow whatsapp