तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री कंगना राणौत या सिनेमात जयललितांची भूमिका साकारणार आहे. आज कंगनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला. यावेळी कंगनासोबत थलायवी सिनेमाची संपर्ण टीम उपस्थित होती. दरम्यान कार्यक्रम सुरु असताना कंगना भावूक झालेली दिसली.
ADVERTISEMENT
या कार्यक्रमाच्यावेळी कंगना इतकी भावूक झाली की तिला रडू कोसळलं. दरम्यान या क्षणाचा व्हिडीयो तिने सोशल मीडियावरही शेअर केला आहे. याबाबत लिहीताना कंगना म्हणते, मी मला बब्बर शेरनी म्हणवते. याचं कारण म्हणजे मी कधीच रडत नाही. इतंकच नाही तर मी इतर कोणाला मला रडवण्याची संधीही देत नाही. यापूर्वी मी केव्हा रडले होते हे मला आठवतही नाहीये. मात्र आज मी रडले…. खूप रडले आणि आता मला फार मोकळं वाटतंय.’
‘थलायवी’साठी कंगनाने वाढवलं होतं 20 किलो वजन; फोटो झाले व्हायरल
थलायवी सिनेमा येत्या एप्रिलमध्ये जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात रिलीज होणार आहे. हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या 3 भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. तर आज मुंबई आणि चेन्नईमध्ये सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी कंगनाने जयललिता यांच्या भूमिकेतील काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये जयललिता यांच्या सुरुवातीचा काळ ते राजकारणातील कारकिर्द दिसून येते. या चित्रपटासाठी कंगनाने बरीच मेहनत घेतलीय. केवळ अभिनयच नाही तर या चित्रपटासाठी कंगनाने तब्बल 20 किलो वजनही वाढवलं होतं.
ADVERTISEMENT