सोमवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्यासंबंधी दिलेल्या CBI चौकशीचे आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान महाराष्ट्रातील या प्रकरणावर अभिनेत्री कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे. ही तर सुरुवात आहे, असे म्हणत कंगनाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकरावर टीका केलीये.
ADVERTISEMENT
यासंदर्भात कंगनाने ट्विटरद्वारे आपलं मत मांडलं आहे. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “जो साधूंची हत्या आणि स्त्रिचा अपमान करतो त्याचं पतन निश्चित आहे. ही तर सुरुवात आहे…. पुढे बघा आणखी काय काय होतं..” या ट्विटमध्ये कंगनाने अनिल देशमुख तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नावं हॅशटॅगने जोडली आहेत.
कोण आहेत जयश्री पाटील? ज्यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुखांना द्यावा लागला राजीनामा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनुसार सचिन वाझे यांना 100 कोटींची वसुली करण्याचा आदेश हा अनिल देशमुख यांनी दिला होता. परमबीर सिंग यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. तो लेटरबॉम्ब हाच अनिल देशमुख यांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये. यानंतर हायकोर्टाने हे सगळं प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी असे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून काल राजीनामा दिला.
सचिन वाझेंचं सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल- कंगना राणौत
एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक झाल्यानंतरही कंगनाने प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यावेळी कंगनाने, योग्य पद्धतीने तपास झाल्यास शिवसेनेचं सरकार पडेल असं म्हटलं होतं. याशिवाय सचिन वाझे प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं असल्याचंही तिने ट्विट केलं होतं.
ADVERTISEMENT