करीना कपूर तिच्या स्टायलिश लुकसाठी ओळखली जाते. तिने झीरो फिगर केली होती तेव्हाही तिची खूप चर्चा झाली होती. अशात आता करीना कपूरला तिच्या लुकसाठी तिला ट्रोल केलं जातं आहे. तिच्या पार्टी वेअरची किंवा कॅज्युअल वेअरचीही खूप चर्चा होते. आता मात्र ती तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे.
ADVERTISEMENT
करीना कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये करीनाने लाल रंगाचा टॉप आणि ब्लू जीन्स घातल्याचं दिसतं आहे. मात्र तिच्या याच लुकमुळे तिला ट्रोल केलं जातं आहे. अनेक युजर्सनही तिच्या या ड्रेसची खिल्ली उडवली आहे आणि तिला तू बॉडी बिल्डर दिसतेस असं सांगत ट्रोल केलं आहे.
सोशल मीडियावर सध्या करीना कपूरच्या याच फोटोंची चर्चा आहे. याच कपड्यांमुळे तिला ट्रोल केलं जातं आहे. करीनाच्या या ड्रेसची अनेक युजर्स खिल्ली उडवत आहेत. viralbhayani च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोट आहेत. या फोटोत तिच्यासोबत सैफ अली खानही दिसतो आहे. ती कारमधून उतरत असतानाचे हे फोटो आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल आहेत.
एक युजर म्हणतो… अरे देवा हिच्याकडे असलेली Bottega बॅगही तिच्या स्टाईलला वाचवू शकली नाही. तर दुसऱ्या एक युजरने म्हटलं की तुझी फॅशनच खालच्या स्तराला गेली आहे. तिसरा युजर म्हणतो तुझ्या स्टायलिस्टला काढून टाक. एका युजरने तर हेपण म्हणून टाकलं आहे की करीना बहुतेक तू स्विमसूट काढायलाही विसरली. तर एक जण म्हणाला आहे की तू या कपड्यांमध्ये बॉडी बिल्डर वाटतेस.
ADVERTISEMENT