कर्नाटकात शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. सोमवारी बंगळुरूमध्ये राकेश टिकैत यांच्यावर काही लोकांनी शाईफेक केली. आधी त्यांनी राकेश टिकैत यांना माईक फेकून मारला. त्यानंतर दुसऱ्या एका माणसाने राकेश टिकैत यांच्या तोंडावर शाई फेकली. टिकैत यांच्यावर शाईफेक आणि माईक फेकणारे दोघेजण स्थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांचे समर्थक होते. या दोघांना अटक करण्यात आली आहे. कार्यक्रमात खुर्च्यांचीही मोडतोड झाली.
ADVERTISEMENT
असं सांगितलं जातं आहे की स्थानिक नेते चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक केली. स्थानिक मीडियाने नुकतंच चंद्रशेखर यांच्याबाबत एक स्टिंग केलं होतं. या व्हीडिओत चंद्रशेखर बस स्ट्राईकच्या बदल्यात पैसे मागत असल्याचं दिसत होतं. एवढंच नाही तर त्यांनी राकेश टिकैत आणि इतर शेतकरी नेत्यांचाही उल्लेख केला होता.
शेतकरी आंदोलनाला संजीवनी देणारे राकेश टिकैत कोण?
बंगळुरूमध्ये मीडियाशी बोलत असताना राकेश टिकैत यांना चंद्रशेखर यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ते म्हणाले की चंद्रशेखर यांच्याशी मला काही घेणंदेणं नाही. राकेश टिकैत म्हणाले की चंद्रशेखर हा फ्रॉड माणूस आहे. त्यानंतर अचानक चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक केली आणि त्यांच्या दिशेने माईक फेकून मारला.
मोदी म्हणाले- शेतकरी एक कॉल दूर, टिकैत म्हणाले नंबर द्या, कॉल करतो
या घटनेनंतर राकेश टिकैत आणि चंद्रशेखऱ समर्थक आपसात भिडले. यानंतर या ठिकाणी असलेल्या खुर्च्यांचीही मोडतोड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात हंगामा पाहण्यास मिळाला. तसंच चंद्रशेखर आणि राकेश टिकैत यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यानंतर राकेश टिकैत यांनी कर्नाटक पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
ADVERTISEMENT