राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी राजीनामा दिला. 2024 ला राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारदीर्दीत अनेक विषय वादग्रस्त ठरले आहेत. यातलंच एक प्रकरण म्हणजे करूणा मुंडे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना घरघुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्यावेळी करूणा मुंडे यांचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं होतं. मात्र, त्यापूर्वी करूणा मुंडे हे नाव 2021 मध्ये चर्चेत आलं होतं. धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे आरोप एका महिलेनं केले होते, त्यानंतर करूणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या नात्याची चर्चा झाली.
हे ही वाचा >>धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला नाही, म्हणाले 'मी तर...' 'या' प्रतिक्रियेचा अर्थ काय?
करूणा मुंडे यांच्याशी असलेले संबंध हे कुटुंबाला माहिती असून, त्यांच्या मुलांना आपलं नावंही दिल्याचं त्यावेळी धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही करूणा शर्मा या निवडणुकीमध्ये, वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांना लक्ष्य करताना दिसल्या आहेत.
सध्या मुंबईत राहत असलेल्या करूणा मुंडे या मूळ मध्यप्रदेशमधील इंदूरच्या रहिवासी आहेत. त्या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये राहत असून, एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कामही करतात. त्यांनी सध्या सगळीकडे करूणा मुंडे हे नाव वापरलेलं असलं, तरी त्यांचं आधीचं नाव करूणा शर्मा असं होतं. धनंजय मुंडे यांच्याशी आपलं लग्न झालं असून, त्यामाध्यमातून आपल्याला मूलही झालं असून, आपणच त्यांची पहिली बायको असल्याचं त्या म्हणतात. तसंच त्या धनंजय मुंडे यांच्यासोबतचे जुने फोटो सुद्धा शेअर करत असतात.
हे ही वाचा >>Santosh Deshmukh यांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, महाराष्ट्राला हादरवणारं नेमकं प्रकरण काय?
करूणा मुंडे या गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय झाल्या असून, राज्यातल्या घडामोडींवरही त्या वारंवार बोलत असतात. करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेत कार्टात याचिका दाखल केली होती. काही दिवसांपूर्वीच वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना करूणा शर्मा यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच आपण 15 लाख रुपये पोटगी मागितली होती, त्यामुळे उच्च न्यायालयात जाणार आहे असं करूणा मुंडे म्हणाल्या होत्या
करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आपल्या आईला त्रास दिला, मला तुरूंगात टाकलं, धनंजय मुंडेंनी मारहाण केली, वाल्मिक कराडने मारहाण केली असे अनेक आरोप करूणा मुंडे यांनी केले आहेत.
ADVERTISEMENT
