Sana Irshad Matoo काश्मिरी पत्रकार सना इर्शाद मट्टू यांना दिल्ली विमानतळावर अमेरिकेत जाण्यापासून रोखण्यात आलं. पुलित्झर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पत्रकार सना या दिल्ली विमानतळावर आल्या. त्यावेळी त्यांना दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावर रोखण्यात आलं. त्यामुळे पुलित्झर पुरस्कार सोहळ्याला त्या अनुपस्थित होत्या. सना यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सदर घटनेची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी काय घडली घटना?
काश्मिरी पत्रकार सना इर्शाद मट्टू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत ही माहिती दिली आहे. अमेरिकतून रोखण्याचं कोणतंही कारण यंत्रणांनी दिलेलं नाही. त्याचसोबत ही घटना आपल्यासोबत दुसऱ्यांदा घडल्याचंही सना यांनी सांगितली आहे. दुसऱ्यांदा सना इर्शाद मट्टू यांना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यात आलं.
सना यांनी काय माहिती दिली आहे?
सना मट्टू यांनी दिलेल्या माहितीनुसार परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेल्या इमिग्रेशन काऊंटरवरून क्लिअरन्ससाठी जेव्हा सना दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. तेव्हा त्यांचा बोर्डिंग पास रद्द करण्यात आला. एअरपोर्ट प्रशासनाने बोर्डिंग पास रद्द करण्यामागचं कारण दिलं नाही.
न्यूयॉर्कमध्ये पुलित्झर पुरस्कार सोहळ्याला जात होत्या सना मट्टू
सना मट्टू यांनी सांगितलं की मी पुलित्झर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला जात होते. या प्रवासासाठी लागणारी सर्व कागदपत्रंही माझ्याकडे होती. मात्र मला दिल्ली विमानतळावर रोखण्यात आलं. सना मट्टू या फोटो जर्नालिस्ट आहेत. कोरोना काळातल्या फोटोग्राफीसाठी सना मट्टू यांनी पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.
2 जुलै रोजी सना यांना पॅरिसला जाण्यापासून दिल्ली विमानतळावर रोखण्यात आलं होतं. सना एका पुस्तक प्रकाशन आणि छायाचित्र प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पॅरिसला जाणार होत्या. मात्र त्यावेळी त्यांना रोखण्यात आलं.
सना यांच्या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रिया
सना यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सना यांना परदेशात जाण्यापासून रोखण्याच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी आणि खेद व्यक्त केला आहे. या निर्णयाविरोधात तुम्ही न्यायालयात जा, असे एका नेटकऱ्याने सुचवलं आहे.
ADVERTISEMENT