गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोपर पुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. शिवसेना-भाजप नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोप आणि मानापमान नाट्यामुळे या सोहळ्याला वेगळचं वळण मिळालं. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना शाब्दीक टोले लगावण्याची संधी सोडली नाही.
ADVERTISEMENT
बसण्याच्या जागेवरुन भाजप आमदार-पोलिसांमध्ये बाचाबाची :
डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले रंगमंदीरात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू स्थानिक भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. बसण्याच्या जागेवरुन आमदार रविंद्र चव्हाण आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हा वाद रंगला. ज्यावर आमदार रविंद्र चव्हाण यांनी, “मी मराठा आहे, जो काही हिशेब आहे तो इथल्या इथे चुकता करेन.” यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविंद्र चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतू यानंतर चव्हाण यांनी मला जे काही बोलायचं आहे ते मी भाषणात बोलून दाखवेन असं सांगितलं.
रविंद्र चव्हाणांची भाषणातून टोलेबाजी :
यावेळी आपल्या भाषणादरम्यान रविंद्र चव्हाणांनी सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच टोले लगावले. “डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. उद्धवजींना बाबुगिरीचा प्रचंड राग आहे, पण काही बाबु पुन्हा पुन्हा तेच तेच करत आहेत. राज्यात कत्तलखान्याच्या नुतनीकरणासाठी पैसे दिले जात आहेत पण वेद पाठशाळांचे पैसे मंजूर केले जात नाहीत. डोंबिवली शहरावर मुख्यमंत्र्यांचं प्रेम आहे, तुमचं नातं आहे या शहराशी यासाठी तुमचा आदर आहे. देवेंद्र फडणवीसांनी या शहरासाठी ४७२ कोटींचा निधी दिला. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री शिंदेनाही डोंबिवलीवर प्रेम करा असं सांगायला हवं. कल्याण-डोंबिवलीत रस्त्याची अनेक कामं प्रलंबित असल्याचं सांगत चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांसमोर पाढा वाचून दाखवला.
एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर –
डोंबिलीकरांना या पुलाचं महत्व वेगळ सांगाण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. चव्हाण साहेबांनी एकाच भागासाठी ४७२ कोटींचा अट्टाहास न धरता संपूर्ण शहराला त्याचा कसा लाभ होईल हे पाहिलं पाहिजे. परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं लागतं. काही अडणची असतील तर तुम्ही माझ्याशी कधीही बोलू शकता, आपले संबंध खराब झालेले नाहीत. कचरा कर हा मोदी साहेबांचा निर्णय आहे, राज्यात देवेंद्र फडणवीसांनी तो लागू केला. तुमच्यापेक्षा १० पटीने आम्ही घोषणा करु शकतो त्यामुळे आम्हाला वेगळं शिकवायची गरज नाही. श्रेयवादासाठी लढाई करणं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही असं म्हणत एकनाथ शिंदेनी रविंद्र चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं.
Sharad Pawar : ‘ED कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगताच येत नाही’
ADVERTISEMENT