यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाच्या संकटातच पार पडत असून, गर्दी टाळण्यासाठी सरकारनं काही मार्गदर्शक तत्व गणेश मंडळासाठी जारी केली आहेत. या सूचनांचं पालन करत लालबागचा राजा गणेश मंडळानं भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावं म्हणून ऑनलाईन दर्शनाची सोय केली आहे. दरम्यान, ‘लालबागचा राजा’च्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापणेला सुरूवात झाली असून, भाविकांना पहिलं दर्शन घेता येणार आहे.
ADVERTISEMENT
पाहा लालबागच्या राजाचे नवे दागिने
गणेशोत्सवाच्या काळात गर्दी झाली, तर तिसऱ्या लाटेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार सर्तक झालं असून, खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत असल्यानं आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारनं सूचना जारी केल्या आहेत.
Lalbaugcha Raja 2021: लालबागच्या राजाचा प्रसाद घरपोच मिळणार, बुकिंग आजपासून सुरु
मुंबईतही महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांसाठी नियमावली जारी करण्यात आली असून, गणेशभक्तांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकार व महापालिकेकडून करण्यात आलेल्या सूचनांचं पालन करत लालबागचा राजा गणेश मंडळानं ऑनलाईन दर्शनाची सोय भाविकांसाठी उपलब्ध करून दिली. आहे.
मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
www.lalbaugcharaja.com
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
https://fb.me/e/1k0x7o4iC
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
या ठिकाणी शुक्रवारी (१० सप्टेंबर २०२१) सकाळी ११ वाजल्यापासून ते रविवारी (१९ सप्टेंबर २०२१) सकाळी ७:०० वाजेपर्यंत ऑनलाईन दर्शनाची सुविधा २४ तास चालू राहणार आहे.
ADVERTISEMENT