पुणे शहर पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी आणि महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना स्टाफ आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आणण्यासाठी गेला होता. परंतू बराच वेळ झाला, तरीही शिल्पा चव्हाण फोन काही घेत नव्हत्या. त्यानंतर स्टाफने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता शिल्पा चव्हाण या गळफास घेतलेल्या आढळून आल्या. यानंतर त्यांच्या स्टाफने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याची शक्यता आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चार लेकरांसह आईची विहीरीत उडी मारत आत्महत्या, जालन्यातली धक्कादायक घटना
ADVERTISEMENT