अकलूज : जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरदेव संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच अडचणीत आला असल्याचं बोललं जातं आहे. नवरा मुलगा ‘अतुल उत्तम आवताडे’ विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार NCR दाखल केला आहे. याबाबत माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी तक्रार नोंदविली होती. हिंदू विवाह कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न कायदेशीर ग्राह्य मानलं जातं नाही, ते रद्दबातलं किंवा अवैध ठरवलं जातं. म्हणजेचं दुसऱ्या पत्नीसोबत केलेला विवाह रद्दबातल ठरतो.
ADVERTISEMENT
मात्र आता या प्रकरणात संबंधित नवरदेवावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं बोललं जातं आहे. त्याचं कारण म्हणजे कायद्यातील काही पळवाटा.
काय आहेत कायद्यातील पळवाटा?
कायदयाचे अभ्यासक ॲड. विनायक सरवळे यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं,
-
494 कलमांतर्गत फक्त पती आणी पत्नीलाचं तक्रार करण्याचा अधिकार आहे. लग्न पूर्णपणे दोन व्यक्तीपुरता मर्यादित विषय असल्याने त्रयस्त व्यक्तीला यामध्ये तक्रार करण्याचा अधिकार कायद्याने दिला नाही.
-
त्यामुळेच राहुल भारत फुले यांनी नोंदविलेली तक्रार कायदेशीर दृष्ट्या वैध ठरतं नाही.
-
या प्रकरणात कोणत्याही पत्नीची तक्रार नाही, आणि तिसऱ्या व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार नसल्यामुळे कोणाच्या तक्रारीवरुन कारवाई करायची हा पेच आहे.
-
संबंधित व्हिडीओ क्लिपमध्ये दोन्ही बहिणींनी नवरदेवाला एकत्र हार घातला आहे. त्यामुळे त्यामुळे पहिली पत्नी कोणती आणि दुसरी कोणती हा एक विषय प्रलंबित राहतो.
-
त्यामुळे नेमका कोणता विवाह अवैध ठरवायचा याबाबतही पेच आहे.
काय आहे प्रकरण?
अतुल उत्तम आवताडे (रा. महाळुंग, गट नं-२) या तरुणाने एकाच वेळी दोन मुलींशी लग्न केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील कांदिवली येथील रिंकी व पिंकी या दोन मुलींशी अतुलने लग्नगाठ बांधली. शुक्रवारी (3 डिसेंबर) दुपारी हॉटेल गलांडे येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. यानंतर विवाहाचे फोटो आणि चित्रीकरण सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दोन्ही बहिणींनी एकाच तरुणासोबत का केला विवाह? अतुल त्यांच्या आयुष्यात कसा आला?
रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणी आहेत. जुळ्या असल्यानं त्यांचं एकमेकींशी घट्ट नातं आहे. दोघी इतक्या एकमेकीत गुंतलेल्या की एकीला त्रास झाला, तर दुसरीला त्रास, अशी दोघींची स्थिती. बालपणापासून दोघींच्या आवडीनिवडीही एकसारख्याच. शिक्षण एकत्रित करुन आयटी इंजिनिअर झाल्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला लागल्या. वडिलांचं छत्र हरवल्यानंतर दोघीही आईसोबत राहतात.
सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तिघींना रुग्णालयात दाखल केले. कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्यानं अतुलनं तिघींची दिवस-रात्र सेवा केली. तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण होऊन यातूनच जुळ्या बहिणीतील एकीचे त्याच्यावर प्रेम जडले. दोन्ही बहिणी एकमेकींना सोडून कधीच राहिलेल्या नाही. वेगळं होणं दोघींना अशक्य झाल्यानं त्यांनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. रिंकी, पिंकीच्या आईनेही अतुलसोबत एकत्रित विवाह करायला संमती दिली.
ADVERTISEMENT