मुंबई: विधान परिषद निवडुकीच्या मतमोजणीमध्ये प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहे. एखाद्या क्रिकेट सामन्याप्रमाणे या मतमोजणीत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत आहे. कारण मतमोजणी दरम्यान, भाजपने रामराजे निबांळकर यांच्या कोट्यातील एका मतपत्रिका आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील उमा खापरे यांच्या कोट्यातील मतपत्रिकेवर आक्षेप घेतला.
ADVERTISEMENT
दरम्यान, या सगळ्यामुळे काही काळ मतमोजणी थांबविण्यात आली होती. यावेळी निवडणूक अधिकाऱ्याने सविस्तर चर्चा करुन सध्या तरी दोन्ही मतं बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सभागृहात नेमकं काय घडतंय?
सुरुवातीला मतदान पार पडल्यानंतर काँग्रेसने मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांची मतं बाद करावी यासाठी आक्षेप घेतला होता. यावरुन बराच खल झाला पण राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळून लावला. ज्यानंतर मतमोजणी सुरु झाली होती. पण या सगळ्यात दोन तासांहून अधिकचा वेळ निघून गेला होता.
दरम्यान, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच भाजपने रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एका मतपत्रिकेवर आक्षेप घेतला. भाजपने घेतलेल्या आक्षेपात असं म्हटलं होतं की, मतपत्रिकेत तिसऱ्या पसंतीचं मतं देताना त्यात खाडाखोड झाली आहे. त्यामुळे ही मतपत्रिका बाद करण्यात यावी असा आक्षेप घेण्यात आला होता.
दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील तात्काळ भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतपत्रिकेवर आक्षेप घेतला. यावेळी पहिल्या पसंतीचं मत देताना खाडाखोड झाली असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.
या सगळ्यामुळे पुन्हा एकदा मतमोजणी काही काळासाठी मतमोजणी थांबविण्यात आली होती. अखेर दोनही मतं बाजूला काढल्यानंतर मतमोजणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली.
ADVERTISEMENT