पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (17 एप्रिल) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मशिदीवरील भोग्यांचा विषय हाती घेतला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा असं म्हटलं की, जर 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर जशास तसं उत्तर दिलं जाईल.राज ठाकरे LIVE : हनुमान चालिसा पठणानंतर मनसेप्रमुखांची पुण्यात पत्रकार परिषद सुरू. ‘हिंदूजननायक’ झाल्यावर पहिल्याच पत्रकार परिषदेत काय बोलणार?
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांच्या दोन महत्त्वाच्या घोषणा..
दरम्यान, राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेली पत्रकार परिषद ही छोटेखानी स्वरुपाची होती. त्यांनी सुरुवातीला भोंग्याविषयी भूमिका मांडली आणि त्यानंतर दोन महत्वाच्या घोषणा केल्या.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ‘मला फक्त दोन गोष्टीची घोषणा करायची आहे त्यापैकी पहिली म्हणजे 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी मी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाचं जे मैदान आहे तिथे मी जाहीर सभा घेणार आहे.’
‘दुसरी गोष्ट म्हणजे 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. त्यामुळे 5 तारखेला मी अयोध्येला पोहचेन तिथे दर्शन घेईन.’ या दोन घोषणा यावेळी राज ठाकरे यांनी केल्या आहेत.
पुण्यात ‘हनुमान चालीसा’ पठण; राज ठाकरेंच्या उपस्थितीत झाली महाआरती
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. काल (16 एप्रिल) दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं, राज ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरतीचा कार्यक्रम पार पडला होता.
राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यानच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मनसेकडून महाआरतीची जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारपासून कार्यक्रमस्थळी लोकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. सायंकाळपासून ढोल-ताशाचा गजर परिसरात सुरू होता. राज ठाकरे यांच्या आगमनानंतर मनसे कार्यकर्त्यांसह उपस्थितांनी जल्लोष केला होता. यावेळी राज ठाकरेंनी भगवी शाल पांघरुन हनुमानाची आरती केली होती.
‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, राज ठाकरेंचा थेट अल्टिमेटम
‘हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..’
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच घेतलेल्या ठाण्यातील सभेत देखील राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की, ‘मशिदीवरील भोंग्यांचा त्रास अख्ख्या देशाला होतो आहे. यात धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काय नमाज पडायचा आहे जी काय अजान द्यायची असेल ती घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते का अडवता? प्रार्थना तुमची आहे तर आम्हाला का ऐकवता. जर सांगून तुम्हाला समजत नसेल की, भोंगे खाली उतरवा.. तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..’ असं ठामपणे राज ठाकरे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT