लोणावळ्याच्या कार्ला गावातील MTDC रिसॉर्ट शेजारी असलेल्या बंगल्यात आज लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पहाटे कारवाई करत ९ पुरुष आणि ८ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ वाहनं, मोबाईल फोन असा ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय.
ADVERTISEMENT
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्लागावचे हद्दीमध्ये एम.टी.डी.सी. रिसॉर्ट जवळ, दुर्गा सोसायटीमधील तन्वी नावाच्या बंगल्यामध्ये ९ पुरुष आणि ८ महिला स्पिकरवर जोरजोरात गाणी लावून अश्लिल हावभाव करत नाचत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या पथकाने दोन पंचाच्या उपस्थितीमध्ये छापा टाकून सदर ठिकाणाहून 9 पुरुष व 8 महिलांना ताब्यात घेत अटक कारवाई केली.
खाजगी बंगल्यामध्ये विनापरवाना सदरचे गैरकृत्य करताना ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्नील जगदीश तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब विर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व राहणार चन्होली व भोसरी परिसर) यांच्यासह 8 महिला यांना ताब्यात घेतले.
सदर ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी 5 वाहने, स्पीकर असा एकूण किं. रु. 74 लाख 27 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अल्पवयीन मुलगा दोन वर्षांपासून करत होता बलात्कार; १६ वर्षाच्या मुलीने बाळाला दिला जन्म
ADVERTISEMENT