राज्याचं हिवाळी अधिवेशन आणि त्याचा चौथा दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने गाजला. देवेंद्र फडणवीस आज महाविकास आघाडी सरकारला विविध मुद्यांवरून घेरलं. बदल्यांचं रॅकेट चाललं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत. वाझे काय लादेन आहे का? इथवर विचारणारा करून त्याची पाठराखण करण्यात आली. स्थगितीपासून खंडणीपर्यंत किती तरी प्रकरणं आत्तापर्यंत बाहेर आली आहेत याबद्दल काय बोलायचं अशी स्थिती आहे असंही फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मागील दोन वर्षात अनेक खंडणी प्रकरणे समोर अली आहेत. पोलीस दलाची अवस्था सुधारली गेली नाही तर हे पोलीस दल सर्वोत्तम दल म्हणून ओळखलं जाणार नाही. बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती मी होम सेक्रेटरीला दिली होती. परंतु सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी तो अहवाल फोडला आणि माध्यमाना दिला. जर पोलीस चार कोटी देऊन पोस्टवर येत असतील तर आपोआप ते वसुलीच करणार’
‘भाजपच्या एजंट’ असा आरोप झालेल्या रश्मी शुक्ला कोण?
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ’23 जानेवारीला भूमी अभिलेखची परीक्षा जीए सॉफ्टवेअर घेणार आहे आणि याला सरकारने परवानगी दिली आहे. प्रितेश देशमुख यांची नुकतीच फेसबुक टाईमलाईन डिलीट मारण्यात अली आहे हे असं का घडलं. त्यांचा एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकासोबत फोटो आहे. आणि फोटो पाहिलं तर लक्षात येईल की यामागे कोण आहे ते. मुळात आशा लोकांना ब्लॅक लिस्ट मधून का काढलं याची माहिती घ्यायला हवी.’
‘राजाचा पोपट मेला आहे, राजाला सांगायचं कसं?’ देवेंद्र फडणवीस यांची नवाब मलिकांवर टीका
राज्यात सुरु असलेल्या शिवभोजन थाळीच्या नावाखाली शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन केल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्यात शिवभोजन थाळी सुरु करत असल्याचा मोठा गाजावाजा केला.आता ती जागा दलालांनी घेतली आहे. या योजनेमध्ये पैसे घेऊन काम देण्यात आले. एकाच व्यक्तीच्या नावावर ही काम देण्यात आली. राज्यात एकूण 1548 केंद्र आहेत. यात अनेक ठिकाणी बोगसगिरी आहे सुरु आहे.’
पोषक आहारात मोठा घोटाळा झाला आहे. परिणामी पालघरमध्ये कुपोषित तीन हजार 149 मुलं होती आणि ऑगस्टमध्ये 40 कुपोषित मुलं मिळाली आहेत. त्यातील 24 बालके मृत जन्माला आली अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT