Maharashtra Bandh : “बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’!”

मुंबई तक

• 05:11 AM • 11 Oct 2021

‘महाराष्ट्र बंद’वरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होताना दिसत आहे. आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदवरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Bandh) आशिष शेलार यांनी ट्वीट करत बंद हा महाविकास आघाडीचा धंदा असल्याची टीका केली आहे. “बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले […]

Mumbaitak
follow google news

‘महाराष्ट्र बंद’वरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होताना दिसत आहे. आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदवरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Bandh)

हे वाचलं का?

आशिष शेलार यांनी ट्वीट करत बंद हा महाविकास आघाडीचा धंदा असल्याची टीका केली आहे. “बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित “बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा… मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले”, असा आरोप शेलार यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

“एवढेच कशाला… आता सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय… कोस्टल रोडला विरोध… नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध… मेट्रोचेही हे विरोधकच… हे तर विकासातील गतीरोधक. बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’ गोळा होतो त्यावरच ‘चंदा’!”, अशी टीका शेलार यांनी केली.

“आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल. आई दुर्गामाते जनतेला दे ‘बळ’! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा ‘खेळ”, अशा शब्दा शेलार यांनी निशाणा साधला आहे.

‘निर्लज्ज’! नितेश राणेंनी ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत ‘आघाडी’वर साधला निशाणा

“१०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने…”

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही महाराष्ट्र बंदवरून टीका केली आहे. “अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे”, असं ते म्हणाले.

Maharashtra Bandh Live Updates: महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला महाराष्ट्रात नेमका कसा प्रतिसाद?

“१०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे. लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार?”, असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

    follow whatsapp