Devendra Fadnavis Budget Speech : शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Goverment) पहिला अर्थसंकल्प (Budget) आज वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साजरा केला. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने महत्त्वाच्या महापालिका असलेल्या शहरांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने अर्थसंकल्पातून मत पेरणी केल्याचा सूर राजकीय वर्तुळ आणि विश्लेषकांमधून उमटला आहे. (Devendra Fadnavis Big Announcement in Maharashtra Budget 2023)
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आधी कोरोना, तर नंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं रखडल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका यंदा होतील, अशी अपेक्षा आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिकमध्ये राजकीय पक्षानी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. त्यामुळेच या शहरांसाठी करण्यात आलेल्या घोषणांना निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्व प्राप्त झालं आहे.
मी अमृताकडे वळतो म्हटलं तर तुम्ही वेगळाच अर्थ काढाल: देवेंद्र फडणवीस
सरकारने महापालिका निवडणुका होऊ घातलेल्या शहरांसाठी कोणत्या घोषणा केल्या?
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे, मुंबईत 337 किमी मेट्रोचे जाळे उभारण्यात येणार असून, 46 किमी खुला झाला आहे. आणखी 50 किमी यावर्षी खुला होणार आहे.
मुंबईतील नवीन मेट्रो प्रकल्प
मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये
गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी
मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये
एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण होणार आहे.
पुणे, नागपूरसह इतर महापालिका हद्दीत कोणत्या घोषणा?
नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी
पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर
अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो
विमानतळांचा विस्तार…
-छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
-नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
– पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
– नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
– मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
– नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
– नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
– नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार; फडणवीसांची मोठी घोषणा
महापालिका क्षेत्रात धार्मिक आणि जातीय समीकरणंही महत्त्वाची ठरतात. त्यानुषंगाने काही मुद्दे सतत निवडणूक प्रचारात असतात. यात एक मुद्दा असतो, महापुरुषांच्या स्मारकांचा. त्यासंदर्भातही सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. स्मारकांचा मुद्दाही निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यानं भरीव तरतूद यासाठी करण्यात आलीये. ती कशी पहा…
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार
– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
– भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये
– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये
– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये
मुंबई महापालिका निवडणुकीवर विशेष लक्ष?
अर्थसंकल्पात मुंबई महापालिका हद्दीत अनेक विकासकामांबद्दलच्या घोषणा आणि तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना गेल्यानंतर भाजप-शिवसेना युती मुंबई महापालिका निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याचबरोबर विविध विकासकामांच्या आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न प्रत्यक्षपणे अर्थसंकल्पातून गेला असल्याचा सूर बजेटनंतर उमटला आहे.
ADVERTISEMENT