मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे आता महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळी आता राज्य सरकार काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. याचविषयी आता अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. अशावेळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेला आज (2 एप्रिल) रात्री 8.30 वाजता संबोधित करणार आहेत. (CM Uddhav Thackeray will address the state on 2nd april 2021 at 8.30 pm)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री ठाकरे हे नेहमीप्रमाणेच या वेळेस देखील सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. त्यामुळे आता यावेळी मुख्यमंत्री नेमक्या काय-काय गोष्टी जाहीर करणार हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून दररोज 35 ते 40 हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर सध्या प्रचंड ताण आला आहे. जर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर पुढील काही दिवसात आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते. अशावेळी राज्य शासनाला काही कठोर निर्णय घेणं भाग पडू शकतं.
यामुळेच आता मुख्यमंत्री हे आरोग्य मंत्र्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आहेत. यानंतर ते आज रात्री साडे आठ वाजता सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून काही निर्बंधांबाबत घोषणा करु शकतात.
पुण्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी, आणखी कठोर निर्बंधही लागू
पुण्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी, आणखी कठोर निर्बंधही लागू
दरम्यान, पुण्यात उद्यापासून (3 एप्रिल) संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच पुण्यात दिवसा जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे आता येथे कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून हा निर्णय अमलात आणला जाणार आहे.
यावेळी पुण्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद असतील. हॉटेलची पार्सल सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 6 नंतर पार्सल सेवा सुरू असणार आहे.
पुढील सात दिवसांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. PMPL ची बससेवाही सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची नेमकी आकडेवारी काय आहे?
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काल (1 एप्रिल) राज्यात एका दिवसात तब्बल 43,183 नवे रुग्ण सापडले होते. तर 249 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. राज्यात काल 249 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.92 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 3,66,533 एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत झोपडपट्ट्यांपेक्षा उंच बिल्डींगमध्ये रुग्णसंख्या जास्त – महापौर किशोरी पेडणेकर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
-
मुंबई – 54 हजार 807
-
ठाणे- 42 हजार 151
-
पुणे- 64 हजार 599
-
नागपूर- 48 हजार 806
-
नाशिक- 36 हजार 292
-
अहमदनगर- 9 हजार 875
-
जळगाव- 6 हजार 969
-
औरंगाबाद- 13 हजार 482
-
लातूर – 5 हजार 931
-
नांदेड- 10 हजार 006
ADVERTISEMENT