Maharashtra political crisis Kapil Sibal arguments: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (14 फेब्रुवारी) महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर नेमका काय निर्णय देणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. याच प्रकरणी आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी कोर्टात तासाभरापेक्षाही अधिक काळ जोरदार युक्तिवाद केला आहे. (maharashtra crisis thackerays battle against shinde 10 important points in kapil sibals argument)
ADVERTISEMENT
आपल्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी असे काही मुद्दे उपस्थित केले की, ज्यामुळे अनेक घटनात्मक पेचप्रसंगांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Ulhas Bapat: ‘…तर शिंदे मंत्री राहणार नाही अन् सरकार कोसळेल’
पाहा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे:
-
नबाम राबिया केसचं पुनरावलोकन करण्याची गरज आहे
-
पक्षांतरबंदीच्या कायद्याचाही फेरविचार करावा लागेल
-
राबिया प्रकरणात अध्यक्षांना पदमुक्तीची नोटीस दिल्यावर ते अपात्रतेचा निर्णय घेऊ शकत नाहीत
-
अधिवेशनावेळीच अध्यक्षांच्या पदमुक्तीचा प्रस्ताव मांडता येतो
-
अध्यक्षांची भूमिका आणि अपात्रता यामध्ये फेरबदल करण्याची गरज
-
आजकाल अधिवेशनच ५-६ दिवसांचं असतं
-
अधिवेशन ५-६ दिवसांचं, मग मुदत १४ दिवसांची कशाला?
-
एकी नोटीसीने अध्यक्षांना हटवणं चुकीचं
-
राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला बजावलेल्या नोटीसवर सिब्बलांची हरकत
-
नार्वेकरांनी केवळ आम्हाला नोटीस बजावली
Maharashtra crisis: राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर बोट, कोर्टात काय घडलं?
दुसरीकडे हे संपूर्ण प्रकरण पाच जणांच्या खंडपीठाऐवजी सात जणांच्या खंडापीठाकडे जावं अशी ठाकरे गटाची मागणी आहे. त्याबाबतही कोर्ट आज निकाल देऊ शकतं.
‘या’ पाच न्यायमूर्तींसमोर सुरू आहे युक्तिवाद
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सत्तासंघर्षाचा युक्तिवाद सुरू आहे.
LIVE VIDEO: Eknath Shinde की Uddhav Thackeray, कोण जिंकणार? सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु
16 आमदार अपात्र ठरणार का?
दरम्यान, ठाकरे गटाची याचिकेच्या पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे की, कोर्टाने सर्वात आधी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय द्यावा. कारण आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे असा ठाकरे गटाचा दावा आहे.
दरम्यान, जर कोर्टाने मुख्यमंत्री शिंदेंसह 16 ही आमदारांना अपात्र ठरवलं तर मात्र, राज्यातील शिंदे सरकारच कोसळेल. त्यामुळेच कोर्टात सुरू असलेला हा संपूर्ण युक्तिवाद नेमका कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहचतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT