महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 390 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 61 लाख 75 हजार 10 कोरोनाबाधित रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आज राज्यात 6 हजार 388 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 208 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा सध्या 2.11 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 3 लाख 26 हजार 812 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 75 हजार 390 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाखात 98 हजार 397 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 2507 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात 62 हजार 351 सक्रिय रूग्ण आज घडीला आहेत. आज राज्यात 6 हजार 388 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 63 लाख 75 हजार 390 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई – 3208
ठाणे-6133
पुणे- 14423
सातारा-6573
सांगली-7027
कोल्हापूर-4245
सोलापूर- 4553
अहमदनगर-4964
नागपूर- 271
महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधले निर्बंध सशर्त शिथील करण्यात येणार आहेत. 15 ऑगस्टपासून राज्यात हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स, दुकानं रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिम, पार्क, सलोन हेदेखील सुरू राहणार आहेत. मात्र त्यासाठी कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करणं बंधनकारक असेल असंही सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT