महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली आहे. महाराष्ट्रात इतके दिवस गुन्हेगार खंडणी मागणी मागत होते. आता सरकार खंडणी मागू लागलं आहे, गृहमंत्री खंडणी मागत आहेत. कुंपण शेत खाऊ लागलं आहे आणि पाण्याला तहान लागली आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. खंडणी मागणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे. गिरीश बापट यांच्या पाठोपाठ खासदार नववीन राणा कौर यांनीही राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
सचिन वाझे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी- देवेंद्र फडणवीस
काय म्हणाल्या नवनीत राणा?
महाराष्ट्रात खंडणी मागण्याचं काम जोरात सुरु आहे. १६ वर्षे सेवेत नसलेल्या सचिन वाझेंना पुन्हा नियुक्त कसं काय करून घेतलं? महाराष्ट्रात फडणवीस सरकार असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना सचिन वाझेंना पुन्हा सेवेत रूजू करून घ्या म्हणून फोन केला होता. मात्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना सेवेत घेण्यास नकार दिला.
उद्धव ठाकरे हे फडणवीसांनंतर मुख्यमंत्री झाले त्यांनी खुर्चीवर बसताच परमबीर सिंग यांना निर्देश दिले की सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घ्या. सचिन वाझेंना नियम डावलून सेवेत घेण्यात आलं. सचिन वाझेंवर एवढे गंभीर आरोप झाले तेव्हा परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. महाराष्ट्रात हे असे प्रकार घडू लागले तर एक वेगळी परंपरा राज्यात पडेल त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली पाहिजे अशी मागणी नवनीत राणा कौर यांनी केली.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही-जयंत पाटील
पूनम महाजन काय म्हणाल्या?
पूनम महाजन यांनीही १०० कोटींच्या मागणीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. महाराष्ट्रात एका एपीआयकडून १०० कोटींची अपेक्षा केली जात असेल आणि गृहमंत्री ती अपेक्षा करत असतील तर इतर एपीआयना किती टार्गेट दिलं असेल आणि या सरकारला किती पैसे जमा करायचे होते याचीही चौकशी झाली पाहिजे तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT