मोठी बातमी! Corona च्या वाढत्या प्रसारामुळे 10 वी आणि 12 वी परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई तक

• 09:34 AM • 12 Apr 2021

कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांशी आज यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य बोर्डाप्रमाणेच इतर बोर्डांनीही निर्णय घ्यावा असंही आवाहन वर्षा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांशी आज यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य बोर्डाप्रमाणेच इतर बोर्डांनीही निर्णय घ्यावा असंही आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आधी शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या मुलांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आणि वाढते कोरोना रूग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला होता. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आहे. अशात आता कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं काय? असा प्रश्न होता.. त्या प्रश्नाचं उत्तर आता वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

मोठी बातमी… 9वी आणि 11वीचे विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात जाणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रात रविवारी 63 हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण एका दिवसात आढळले. तर 301 मृत्यूंची नोंद एका दिवसात झाली. राज्यात लॉकडाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे. ब्रेक द चेन म्हणजेच कोरोनाची साखळी तोडायची असेल तर काय केलं पाहिजे? यावर उपाय योजण्यासाठी डॉक्टरांच्या टास्कफोर्सची एक बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत पार पडली. या बैठकीत डॉक्टरही लॉकडाऊनच्याच बाजूने होते आता लॉकडाऊन आठ दिवसांचा लावला जाईल की 14 दिवसांचा एवढाच निर्णय होणं बाकी आहे. यासंदर्भात 14 एप्रिलच्या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार आहेत.

    follow whatsapp