महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं. सीमाभागात निर्माण झालेल्या तणावावरून संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला काही सवालही केले.
ADVERTISEMENT
कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगावला जाणार होते. मात्र, दोन्ही मंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं. बेळगावला जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात. डरपोक सरकार. यांना महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही.”
Maharashtra Karnataka Border Dispute : ‘तुमचं सरकार गेलं खड्ड्यात, ताबडतोब…’, संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात
“यांना महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही. सीमा कुरतडल्या जाताहेत. 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून, रक्त शिंपण करून महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली आहे. कुणी या बाजूला कुरतडतंय, कुणी त्या बाजूला कुरतडतंय आणि हे सरकार षंडासारखं बसलेलं आहे. हे नामर्द सरकार आहे. अशा वेळी विरोधी पक्षाची सर्वात जास्त आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“तीन महिन्यापासून या सरकारने महाराष्ट्राचं दिल्लीतल्या दारातलं पायपुसणं करून टाकलं आहे. महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्राची लूट दिल्लीच्या चरणी विनासायास अर्पण करावी म्हणून हे सरकार बसवलेलं आहे. आता तर कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो आणि हे स्वतःला भाई समजणारे मुख्यमंत्री… हे भाई आहेत ना? यांना भाई म्हणतात ना? मग भाईगिरी दाखवा ना. कसले भाई तुम्ही?”, असा सवाल संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.
“तुम्ही कधी बेळगावात जाऊन लाठ्या खाल्ल्या असतील तर दाखवा आम्हाला. रेकॉर्ड सगळ्यांचे आहेत. दाखवा या महाराष्ट्राला, नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनिटंही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.
बेळगावसाठी महाराष्ट्रासोबत लढणारी ‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना आहे तरी काय?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? संजय राऊतांचा सवाल
“ज्या पद्धतीने 24 तासांपासून सीमाभागात सरकारी प्रेरणेनं, कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होतेय, हल्ले होताहेत आणि प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना तुरुंगात डांबलं जात आहे. महाराष्ट्रात सरकार आहे की नाही?”, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
“महाराष्ट्राच्या अस्मितेचं, महाराष्ट्राच्या सार्वजनिक मालमत्तेचं, महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. या सरकारला एक दिवसही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT