महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार हे आता जवळ जवळ निश्चित झालंय. येत्या दोन – तीन दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणाही होण्याची शक्यता आहे. पण आता लॉकडाऊन लागणार तर तो कसा असेल? लोकल ट्रेन बंद होतील का? आता लागणारा लॉकडाऊन मागच्यावेळी सारखा कडकडीत असेल का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत. त्यामुळे आता लागणारा कसा असू शकतो हे जाणून घेऊया..
ADVERTISEMENT
सगळ्यात पहिले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या लॉकडाऊनच्या निर्णयासंदर्भात अनेक महत्त्वाच्या बैठका घेत आहेत. सर्वपक्षीयांबरोबर पहिली बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्या बैठकीत वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावं असं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिवाय मुंबई लोकलसाठी पिक अवर्स ठरवण्यासंदर्भातही चर्चा झाली. त्यामुळे यातून यंदाचा लॉकडाऊनची आधीच्या लॉकडाऊन इतका कडकडीत केला जाणार नाही, तो तितका कठोर नसेल असा सरकारचा प्रयत्न असणारे.
1) अत्यावश्यक सेवा सुरू राहतीलच म्हणजे
– वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स
– वृत्तपत्र, मीडीया संदर्भातील सेवा
– दूध विक्री भाजीपाला विक्री, फळे विक्री, पेट्रोल पंप
– किराणा दुकाने, अंडी आणि मास दुकाने, पशू खाद्य दुकाने
– बँक आणि पोस्ट सेवा
– कोरोना विषयक लसीकरण सेवा आणि चाचणी केंद्र, ऑप्टीकल्स दुकानं
अत्यावश्यक सेवेतील सर्वकाही सुरु राहणार.
2) फक्त अत्यावश्यक सेवेतील सर्वांसाठी वाहतूक सुरू राहण्याची शक्यता
रेल्वे, बस, एसटीचा वापर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी करू शकतील, त्याव्यतिरिक्त रस्त्यावर कोणालाही प्रवासाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता.
3) होम डिलिव्हरी सेवेवर भर दिला जाईल
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवता येणार नाही, मात्र होम डिलीव्हरीची मुभा असेल. घरपोच मद्य सेवा सुरु ठेवली जाण्याची शक्यता आहे.
4) जिल्ह्यांतर्गत प्रवास बंद होण्याची शक्यता
मागील लॉकडाऊनप्रमाणे या ही लॉकडाऊनमध्ये जिल्हा पातळीवरच्या सीमा पुन्हा एकदा बंद केल्या जाण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात अतिमहत्वाच्या कामा व्यतिरिक्त जाता येणार नाहीय. जायचंच असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. भाजीपाला, दुध, फळं, आरोग्य सेवकांच्या वाहनांना मात्र परवानगी असू शकते.
5) विमान सेवा सुरूच राहण्याची शक्यता
मागच्यावेळी परदेशातून येणाऱ्यांमधून प्रामुख्याने कोरोनाचा प्रसार होत होता. पण आता मात्र तसं चित्रं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून इतर देशांत जाणाऱ्या विमानांवर बंदी घातली जाणार नाही, अशी शक्यता आहे. पण विदेशातून आणि इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना चाचणी अनिवार्य असेल. तसेच 7 ते 14 दिवासांचा क्वारंटाईन कालावधी कायम राहिल. तसेच इतर राज्यात किंवा परदेशात जायचं असेल तर इकडून सुद्धा चाचणी करूनच जावं लागण्याची शक्यता आहे.
6) वीकेंड लॉकडाऊनमध्ये ज्या प्रमाणे गॅरेज सर्विस,ट्रानस्पोर्ट वाहन दुरुस्ती सेवा, वाहनांचे स्पेअर पार्ट पुरवणारी दुकानं कोरोनाच्या नियमांचं पालन करून सुरु राहण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेऊन असेल.
7) एसी, कुलर, फ्रीज दुरुस्ती दुकानं सुरु नसतील. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरची दुकानं बंद राहण्याची शक्यता.
ADVERTISEMENT