बुलेट चालवत पिस्टल हातात घेऊन रिल्स बनवणं भोवलं नगरसेवकाच्या मुलावर कारवाई…
राष्ट्रवादीचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी या दोघांनी अपवादात्मक रिल्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहे. हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्टल घेऊन त्यांनी रिल्स तयार केले.हे सोशल मीडियावर वायरल होताच सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
सलगरवस्ती पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सचिन शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.फिर्यादीत नमूद केल्यानुसार रिल्स तयार करणाऱ्यावर भा.द.वि.505,279 व भारतीय शस्त्र अधिनियमनुसार गुन्हा दाखल झाला.
सलगरवस्ती पोलीस सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रिल्समुळे सावध झाले आहेत.रिल्स तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दोघांना बोलावून त्यांची पिस्टल जप्त केली जाणार आहे. तसचं, ती पिस्टल खरी आहे का याची शहानिशा केली जाणार आहे.खरी पिस्टल असेल तर ती जप्त करून शस्त्र परवान्याबाबत चौकशी केली जाईल.
आमदार हसन मुश्रीफ यांची ईडी कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया…
आमदार हसन मुश्रीफ जेव्हा त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोहोचले त्यावेळी त्यांनी आपण माध्यमांशी चार वाजता बोलणार असं सांगितलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांनी झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली.
‘वकील माझी बाजू मांडतील. मार्च एंडिंग सुरू असल्याने मला अनेक कामांसाठी वेळ हवा आहे. तो वेळ मी ईडीकडे मागणार. जिल्हा बँकेचा मी अध्यक्ष असल्याने बँकेच्या कामासाठी वेळ घेणार.आतापर्यंत माझं इडीच्या चौकशीत नाव नव्हतं. आता माझे नाव आले आहे त्यांना समाधान होईल असे उत्तर देऊ.माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही.’ अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार मनिषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा अशी भूमिका मांडली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले.
वसईच्या कळंब समुद्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
समुद्रात पोहण्याचा आनंद दोघांच्या जीवावर बेतला आहे. वसई पश्चिमेच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या चार तरुणांपैकी दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
सौरभ पाल व रोशन गावडे अशी या मयत तरुणांची नावं असून ते इतर दोन मित्रांसोबत वसईच्या कळंब समुद्रकिनारी दुपारी समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. या दोघांपैकी एकाचा मृतदेह भुईगांव समुद्र किनारी सापडला असून, एकाच शोध घेतला जातं आहे.
कांद्याचे 85 हजार अन् 11 तोळे सोने गायब
घराला कुलूप लावून मुलाच्या सासरवाडीला गेल्याची संधी चोरट्यांनी साधून कांदा विक्रीतून आलेले 85 हजार रुपये आणि 11 तोळे सोने घेऊन पोबारा केला. ही घटना होनसळमधील तानाजी लक्ष्मण पवार यांच्या घरी घडली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळमधील तानाजी लक्ष्मण पवार हे घर बंद करून कुटुंबीयांसमवेत बार्शीतील मुलाच्या सासरवाडीला नातवाला पाहण्यासाठी गेले होते.परत आल्यानंतर त्यांना दरवाजा उचकटल्याचे लक्षात आले.त्यांनी घर उघडल्यानंतर घरातील कांद्याची आलेली पट्टी 85 हजार रुपये रोख तसेच विविध प्रकारचे 11 तोळे दागिने जागेवर दिसून आले नाहीत.
त्यांनी तात्काळ सोलापूर तालुका पोलिसांना फोन करून ही माहिती कळवली.पोलिसांनी घटनास्थाळाची पाहाणी केली असून चोरांचा शोध सुरूय.
शिंदे-फडणवीस सरकार मार्चला कोसळेल -जयंत पाटील
सांगली : “राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील नाही. कृषिमंत्री शेतकरी आत्महत्यांबाबत चुकीचं वक्तव्य करत आहेत, असा आरोप करत जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. ते सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे जयंत केसरी बैलगाडा स्पर्धेदरम्यान माध्यमांशी बोलत होते.
“14 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी असून, आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. त्यावेळी सरकार पडेल की काय होते ते बघू, असं सांगताना शिंदे-फडणवीस सरकार 14 मार्चला कोसळेल”, असं विधान त्यांनी केलं.
“वास्तविक निधी कधीही थांबवला जात नाही, पण या सरकारने तेही करून दाखवले आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांचा निधी अडवला जातो आणि केवळ सरकारला पाठिंबा देणाऱ्या 40 आमदारांना निधी दिला जात आहे”, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा
खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध करत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली.
खासदार जलील हा एमआयएम पार्टीचा राजकारण करणारा माणूस असून त्याला आमच्या परीने आम्ही रोखठोक उत्तर देऊ. जलील हे करीत असलेल्या उपोषण साखळी आंदोलनात बिर्याणी पार्ट्या रंगत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त लोक क्रिमिनल आहेत अशांचा शोध घेऊन पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आम्ही केली आहे.
खासदार जलील यांच्यामुळे जर उद्योजक जगतात अशांततेचे वातावरण निर्माण होत असेल तर उद्योजकांच्या आम्ही ठामपणे पाठिशी उभे आहोत अशी भूमिका आमदार सिरसाट यांनी मांडली.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाचं तिसऱ्या आठवड्यातील कामकाज आजपासून सुरू होईल. अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, त्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू होईल. अर्थसंकल्पात सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, त्यावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्याची चिन्ह आहेत. शेतमालाला भाव, अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत यासह राज्यातील इतर मुद्द्यावरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक होण्याची अंदाज आहे.
ADVERTISEMENT