मुंबई: महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आजवरचा सर्वात मोठा आकडा समोर आला आहे. कारण गेल्या 24 तासातील राज्यात 47 हजार 827 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 202 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारची चिंता वाढली आहे. त्यातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कारण वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, राज्यात आज 24,126 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 24,57,494 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.62 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 202 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.91 टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे, कारण…
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,01,58,719 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 29,04,076 (14.41 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,01,999 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 3,89,832 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई – 57 हजार 687
-
ठाणे- 45 हजार 033
-
पुणे- 70 हजार 851
-
नागपूर- 50 हजार 775
-
नाशिक- 37 हजार 263
-
अहमदनगर- 11 हजार 454
-
जळगाव- 7 हजार 345
-
औरंगाबाद- 13 हजार 204
-
लातूर – 6 हजार 474
-
नांदेड- 11 हजार 017
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतली तर पुण्यात आणि नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 70 हजारांपेक्षा जास्त रूग्ण तर नागपुरात 50 हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.
मुंबईत दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला आहे. आज दिवसभरात मुंबईत 8 हजार 844 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 5 हजार 352 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 61 हजार 043 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 84 टक्के आहे. डबलिंग रेट 46 दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT