मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती ही दिवसेंदिवस अत्यंत भयंकर होत चालली आहे. कारण आज (7 एप्रिल) राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 59 हजार 907 नवे रुग्ण सापडले आहेत. हा महाराष्ट्रातील आजवरचा सर्वाधिक रुग्णसंख्येचा आकडा आहे. कारण एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण याआधी कधीच सापडले नव्हते. याशिवाय चिंताजनक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 322 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसंच आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे सध्या राज्यात 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने 5 एप्रिपासून 30 एप्रिलपर्यंत राज्यात अत्यंत कठोर निर्बंध लागू केले आहे. हा प्रकारचा लॉकडाऊनच आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, असं असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने बरीच चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्यात आज 30,296 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 26,13,627 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.36 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 322 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.79 टक्के एवढा आहे.
Corona रोखण्यात आलेलं अपयश काही राज्यं आमच्या माथी मारत आहेत-डॉ. हर्षवर्धन
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,11,48,736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31,73,261 (15.00 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25,78,530 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,212 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 5,01,559 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आता गुजरातमधल्या शहरांमध्येही नाईट कर्फ्यू!
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई – 83 हजार 185
-
ठाणे- 65 हजार 431
-
पुणे- 90 हजार 048
-
नागपूर- 59 हजार 595
-
नाशिक- 33 हजार 575
-
अहमदनगर- 18 हजार 609
-
जळगाव- 8 हजार 061
-
औरंगाबाद- 18 हजार 621
-
लातूर – 8 हजार 780
-
नांदेड- 11 हजार 309
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास मुंबई पाठोपाठ पुण्यात आणि नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 90 हजारांपेक्षा जास्त रूग्ण तर नागपुरात 59 हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.
मुंबईत दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 10 हजार 442 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 6 हजार 007 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 88 हजार 011 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 80 टक्के आहे. डबलिंग रेट 35 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT