मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)8535 नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा वाढत असल्याचं यावेळी दिसून येत आहे. यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता देखील वाढत आहे. त्यातच कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट सापडत असल्याने त्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, दिवसभरात 156 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,25,878 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 8535 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील महिन्यात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 165 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात 11 जुलै रोजी 6,013 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 59,12,469 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.02 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 156 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.04 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,40,10,550 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,57,799 (13.99 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,96,279 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,772 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,16,165 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई (Mumbai) – 11 हजार 423
-
ठाणे (Thane) – 16 हजार 626
-
पुणे (Pune) – 19 हजार 034
-
नागपूर (Nagpur) – 2 हजार 301
-
नाशिक (Nashik)- 3 हजार 652
-
कोल्हापूर (Kolhapur) – 13 हजार 157
-
अहमदनगर (Ahmednagar) – 3 हजार 786
-
सातारा (Satara) – 8 हजार 505
-
सांगली (Sangli)- 11 हजार 717
-
औरंगाबाद (Aurnagabad)- 695
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 18 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे जिल्ह्यात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये देखील सध्या 13 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
देशातले 53 टक्के Corona रूग्ण महाराष्ट्र आणि केरळमधले, आरोग्य मंत्रालयाची माहिती
मुंबईत दिवसभरात सापडले 555 रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 555 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 666 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 27 हजार 696 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96 टक्के आहे. डबलिंग रेट 928 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT