महाराष्ट्रात सात महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रूग्णांच्या संख्येने निचांक गाठला आहे. रोज सरासरी 2800 ते 3500 या घरात येणारी संख्या आज सर्वात कमी अर्थात 2583 इतकी नोंदवली गेली आहे. आज दिवसभरात राज्यात 2583 रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात दिवसभरात 28 कोरोना रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
आज महाराष्ट्रात 3836 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 40 हजार 723 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.18 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 71 लाख 64 हजार 401 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 24 हजार 498 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात 2 लाख 75 हजार 736 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1677 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 41 हजार 672 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2583 नवीन रूग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 24 हजार 498 झाली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई- 5109
ठाणे-5748
पुणे-11193
सातारा-3002
सांगली-1732
सोलापूर-2347
अहमदनगर- 5551
महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून जास्त सक्रिय रूग्ण आहेत. या सक्रिय रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात 11 हजारांहून अधिक रूग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यात 5700 पेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. मागच्या सात महिन्यांपासून महाराष्ट्र दुसऱ्या लाटेचा कहर सहन करतो आहे. अशात राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे हे गेल्या काही दिवसांपासून दिसतं आहे. आज सात महिन्यांतून पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे. 2583 ही आजची रूग्णसंख्या आहे.
मुंबईत दिवसभरात 419 नवे रूग्ण
मुंबईत दिवसभरात 419 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 447 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 15 हजार 394 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत आज घडीला 4595 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1194 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT