Maharashtra SSC Result 2021 दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालाची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच आपलं निकाल पत्र हाती मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना यंदा दहावीचे गुण देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
असा आहे विभागवार निकाल
राज्याचा निकाल 99.95 टक्के
नऊ विभागीय मंडळाने घेतली परीक्षा
सर्वात जास्त निकाल 100 टक्के कोकण
सर्वात कमी निकाल 99.84 टक्के नागपूर
औरंगाबाद 99.96 टक्के
मुंबई 99.96 टक्के टक्के
कोल्हापूर 99.92 टक्के
अमरावती 99.98 टक्के
नाशिक 99.96 टक्के
लातूर 99.96 टक्के
एकूण 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थी संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे, त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण 72 विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये 27 विषयांचा निकाल 100 % टक्के लागला आहे राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 6 लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 218070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या निकालाचं विशेष महत्त्व म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे आज दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर झाला आहे. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT