अखेर दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी (१७ जून) दुपारी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर बघता येणार आहेत.
मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी, तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थींनी परीक्षा दिली होती.
कसा आणि कुठे बघा निकाल
दहावीचा निकाल बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत.
या वेबसाईटवर बघता येणार निकाल…
http://www.mahresult.nic.in/
http://sscresult.mkcl.org/
https://ssc.mahresults.org.in/
https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-10-2022
निकाल कसा बघाल?
दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही तो बघू शकणार आहात. १०वीचा निकाल पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आधी www.mahresult.nic.in किंवा http://sscresult.mkcl.org/ किंवा https://ssc.mahresults.org.in/या महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर जा.
निकालाची साईट ओपन झाल्यानंतर दिलेल्या रकान्यामध्ये रोल नंबर आणि आईचं नाव ही महत्त्वाची माहिती भरा.
विद्यार्थ्यांना दोन्ही रकान्यात माहिती भरणं आवश्यक आहे. त्यानंतर View Result या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला स्क्रिनवर तुमचा निकाल दिसेल. त्यानंतर तुम्ही निकाल डाऊनलोड करू शकता.
ADVERTISEMENT