महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर बच्चू कडूंना स्वतःला क्वारंटाइन केलं आहे. कडू यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली असून गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन कडू यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ चिंताजनक आहे. महाराष्ट्रात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा निर्बंध कडक केले असून अमरावती आणि यवतमाळमध्ये लॉकडाउनची घोषणाही करण्यात आली आहे.
अवश्य वाचा – कुठे लॉकडाउन तर कुठे जमावबंदी, जाणून घ्या राज्याची परिस्थिती!
गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली ज्यात वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अवश्य वाचा – नवीन स्ट्रेनसाठी मुंबईतील 5 टक्के सॅम्पल्स NIV ला पाठवणार
ADVERTISEMENT