कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. परंतू दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा केली असून यासाठीचे नियम व निकष जाहीर केले आहेत. रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सिजनची बेडची उपलब्धता यावर जिल्हे अनलॉक केले जाणार आहेत.
ADVERTISEMENT
या दोन निकषांच्या आधारावर राज्य सरकारने पाच स्तरांमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली असून मालिका आणि सिनेमाच्या चित्रीकरणाला यात परवानगी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठीसह अनेक हिंदी मालिकांची चित्रीकरण लॉकडाउनमुळे गोवा, दीव-दमण, सिल्वासा, जोधपूर, उदयपूर येथे होत होती. त्यामुळे राज्य सरकारच्या या नियमाचा मनोरंजन क्षेत्राला चांगलाच फायदा होणार आहे. निर्बंध शिथील करण्यासाठी जिल्ह्यांची पाच स्तरात गटवारी करण्यात आली आहे. यासाठी सरकारने पाच स्तर निश्चीत केले आहेत.
सरकारी नियमाप्रमाणे असे असतील पाच स्तर –
१) कोरोना पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे
२) पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
३) पॉजिटीव्हीटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
४) पॉजिटीव्हीटी रेट १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड ६० टक्क्यांपर्यंत भरले असतील असे जिल्हे
५) पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
या पाच स्तरांपैकी पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये शुटींगला परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या स्तरातील जिल्ह्यांसाठी मात्र सरकारने काही नियम आखून दिले आहेत. ज्यात निर्मात्याला सर्व सदस्यांसाठी बायो सिक्युअर बबल तयार करावं लागणार असून संध्याकाळी ५ वाजल्यानंतर कोणालाही बबलबाहेर जाण्याची परवानगी मिळणार नाहीये.
याव्यतिरीक्त चौथ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये शुटींग करायंच असेल तर बायो सिक्युअर बबलसोबत निर्मात्यांना गर्दीचे प्रसंग चित्रीत करता येणार नाहीयेत. याचसोबत नेहमीच्या दिवसांमध्ये संध्याकाळी ५ नंतर बायो बबलच्या बाहेर जाण्यास मनाई तर शनिवार-रविवारी संपूर्ण दिवस बबलबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. पाचव्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये चित्रीकरणाला परवानगी नाकारण्यात आली आहे.
पहिल्या स्तरातले जिल्हे – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
दुसऱ्या स्तरातले जिल्हे – हिंगोली, नंदुरबार
तिसऱ्या स्तरातले जिल्हे – मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम
चौथ्या स्तरातले जिल्हे – पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
पाचव्या स्तरातले जिल्हे – या गटात अद्याप कोणत्याही जिल्ह्याचं नाव आलेलं नसलं तरीही आठवड्याला परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्ह्याचा पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर गेला तर हा जिल्हा या रेड झोनमध्ये येऊ शकतो.
(विशेष टीप : – सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार हे संभाव्य जिल्हे या गटवारीत मोडले जातात. परंतू यासंबंधीचा अंतिम निर्णय हा स्थानिक जिल्हा-पालिका प्रशासन घेणार आहे.)
ADVERTISEMENT