Maharashtra Weather Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटा पसरल्या असून विदर्भ आणि कोकणात पारा चांगलाच वाढल्याचं चित्र आहे. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा दिला आहे. काल चंद्रपूरमध्ये 16 मार्च 2025 ला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता.
ADVERTISEMENT
अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला आणि नागपूरमध्ये उष्णता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. दरम्यान आज 17 मार्च 2025 ला राज्यातील हवामान कसं असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदियामध्ये आज कोरडं हवामान असणार आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5… … भेट घ्या. pic.twitter.com/CGAdBPXopx
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 16, 2025हे ही वाचा >> Honeymoon वेळी झालेला पती-पत्नीचा मृत्यू, आता काकूने सांगितली नवी कहाणी
15 मार्चला सोमवारी विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, चंद्रपूर, ब्रम्हपुरी आणि वर्ध्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेल्याने उष्णता अधिकच वाढली होती. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याचं समोर आलं होतं. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 41.2 अंशावर पोहोचला होता.
🚨 Mumbai temperatures have witnessed 5 degree fall this week -
10 Mar - 37.2°C 📈
11 Mar - 39.2°C 📈📈🌡️
12 Mar - 38.6°C 📈
13 Mar - 34.9°C 📉
14 Mar - 34.5°C 📉
15 Mar - 35.1°C 📈
16 Mar - 34.2°C 📉📉
हे ही वाचा >> Pune : अरिजित सिंगच्या कॉन्सर्सटसाठी पुण्यात वाहतुकीत बदल, कोणते रस्ते बंद, कुणाचा ताप वाढणार?
ADVERTISEMENT
