महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. ऑक्सिजन स्टोअरेज टँक, बफर स्टॉक निर्माण करणं याची व्यवस्था करणं सुरू आहे. तिसरी लाट येण्याची वाट न पाहता ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट लवकरच स्वयंपूर्ण होणार असं आज राजेश टोपे यांनी म्हटलं होते.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात 45 आणि त्यावरील लोकांसाठी काल महाराष्ट्रात 25 हजार लसी उपलब्ध होत्या. आता 9 लाख डोस अर्ध्या तासापूर्वी आले आहेत. हे कोव्हिशिल्डचे डोस आहेत. ते आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला पाठवण्यात येणार आहेत. 45 वर्षाच्या वरील 1 कोटी 65 लाख लोकांचं लसीकरण केलं आहे. हे प्रमाण एकूण त्यांच्या संख्येच्या 45 टक्के आहे. उर्वरित 50 टक्के नागरिकांना लसी देणं बाकी आहे. देशामध्ये जी चार ते पाच राज्यं आहेत ज्यांनी 1 मे रोजी लसीकरण सुरू केलं त्यापैकी एक महाराष्ट्रही आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘मला हे वाचून धक्काच बसला’, Remdesivir वरून राज ठाकरेंचं मोदींना पत्र
महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्या कमी होते आहे मात्र 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढतो आहे. तो नियंत्रणात आणण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे असं आज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 27 टक्क्यांवरून 22 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आपण 65 टक्के RTPCR चाचण्या करतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचं कौतुक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये केलं आहे.
महाराष्ट्रात रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढतं आहे हेदेखील एक सकारात्मक लक्षण आहे असं म्हणता येईल. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा 84 टक्के इतका आहे. देशाचा रिकव्हरी रेट 81 टक्के आहे देशापेक्षा राज्याचा रिकव्हरी रेट नक्कीच चांगला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. दोन महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेत. पहिला मुद्दा आहे तो रेमडेसिवीरचा. रेमडेसिवीरचा पुरवठा 9 मेपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तो कमी पडतो आहे मात्र आपण संख्यानिहाय आपण त्याचं वाटप करत आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातले 15 जिल्हे, कोरोना रूग्ण बरे होण्याबाबत ठरत आहेत आशेचा किरण
दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सिजनचा आहे. ऑक्सिजन बचत करण्यासाठी सातत्याने ऑक्सिजन ऑडिट करतो आहोत. लिकेज थांबवणं, ऑक्सिजन वाया न घालवणं, ऑक्सिजन नर्स ही संकल्पनाही अस्तित्त्वात आणतो आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी 150 प्लांटची ऑर्डर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जो निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचा वापर करून तिसरी लाट येण्याची वाट न पाहता महाराष्ट्राला याबाबतीत आपण स्वयंपूर्ण करायचं आहे हे आमचं लक्ष्य आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT