साक्षी तंवर ची नवी वेबसीरिज माई ही लवकरच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या सीरिजचा ट्रेलर आला आहे. तो आल्यापासून सोशल मीडियावर याच ट्रेलरची चर्चा आहे. या ट्रेलरमध्ये साक्षी तंवर तिच्या मुलीच्या खुन्याला शोधताना दाखवली आहे. सध्या या ट्रेलरची चर्चा चांगलीच रंगली आहे.
ADVERTISEMENT
नेटफ्लिक्स इंडियाने गेल्या वर्षी आपल्या नव्या शोंची घोषणा केली होती त्याचवेळी या सीरिजचीही घोषणा केली होती. कोरोना काळात येणाऱ्या सिनेमा आणि सीरिज यांचं प्रमाण कमी झालं होतं. त्याचाच परिणाम माई सीरिजवरही झाला. अशात ट्रेलर समोर आल्याने लोक याच सीरिजची चर्चा करत आहेत. या ट्रेलरमध्येही साक्षीच्या दमदार अभिनयाची झलक दिसून येते आहे.
माईची स्टोरी काय?
माई ही गोष्ट आहे शील नावाच्या एका मध्यमवर्गीय महिलेची. ती नर्सही आहे. तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलीचा म्हणजेच सुप्रियाचा खून होतो. या एका घटनेने तिचं अख्खं आयुष्य बदलतं. मुलीच्या खुनानंतर शीलचा एकच उद्देश आहे तो म्हणजे आपल्या मुलीच्या खुन्याला शोधून काढणं. मुलीच्या मृत्यूच्या दुःखात बुडालेली स्त्री कशा पद्धतीने मुलीच्या खुन्याचा शोध घेते? तिला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सीरिजमध्ये कळणार आहेत.
क्राईम आणि पॉवर यांच्या जाळ्यात अडकलेली शील साक्षीने खूप दमदार अभिनयातून रंगवली आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लवकरच ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे. ट्रेलरमध्ये साक्षीचा अंदाज पाहून आपल्याही अंगावर काटा येतो. तिला अनेक माणसं भेटत जातात. आपल्या मुलीच्या खुन्याला शोधणारी आणि आधी शांत स्वभावाची असणारी शील कशी चंडिकेच्या रूपात येते ते देखील या छोट्याश्या ट्रेलरमध्ये अधोरेखित होतं. साक्षीला आपण अशा भूमिकेत याआधी कधीही पाहिलेलं नाही. त्यामुळे या सीरिजची चर्चा तर होणारच यात शंका नाही.
साक्षीसोबत वामिका गब्बी, रायमा सेन, विवेक मुशरन, अनंत विधानत आमि सीमा पाहावा यांच्याही भूमिका आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन अनशई लाल आणि अतुल मांगिया यांनी केलं आहे. अनुष्का शर्माचा भाऊ कर्नेश शर्माने या सीरिजची निर्मिती केली आहे. 15 एप्रिलला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे.
ADVERTISEMENT