-गणेश जाधव, उस्मानाबाद
ADVERTISEMENT
पीक विमा परताव्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबादेत निंबाळकर आणि पाटील कुटुंबातील जुन्या संघर्षाला नव्यानं तोंड फुटलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात तू-तू, मैं-मैं झाली. ओमराजे निंबाळकरांनी औकातीत राहण्याची भाषा केल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील यांनीही खासदार निंबाळकरांना इशारा दिलाय.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा परताव्यासंदर्भातील मुद्द्यावर बैठक होती. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. बैठकीतील हा वाद माध्यमातून समोर आला. त्यानंतर आता आमदार राणा जगजितसिंह पाटलांचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना व्हिडीओतून आपल्याशी गाठ असल्याचं म्हणत इशारा दिलाय.
भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर मल्हार पाटील टीका केलीये.
ओमराजे निंबाळकरांची सटकली; “तु तुझ्या औकातीत रहा” म्हणतं राणा जगजितसिंह पाटलांना भिडले
मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांना काय दिला इशारा?
मल्हार पाटील म्हणतात, ‘ओम्या तू आज लय बोललास. अवकातीपेक्षा जास्त बोललास. राणा दादा तिथे कॅमेरा होते, कलेक्टर होते म्हणून राणा दादांनी आवरत घेतलं; पण तू कोण बोलणारा? तुझी औकात काय? आम्ही खानदानी लोक आहोत. संस्कार आहोत. तू बोलतोस म्हणून मला बोलावे लागते. तुझ्याविषयी बोलतानाही मला लाज वाटते. तुझं राहतं घर, शेती, पुण्यातील फ्लॅट माझ्या आजोबांनी तुला दान केलं आहे बाळा, असं म्हणत मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांना पुन्हा डिवचलं.
“तू कोणाच्या संस्काराबद्दल बोलतोस? राणा दादासारखा माणूस या जिल्ह्याला मिळाला. लोकांनी त्यांना आपलेसं केलं. तू एखादा रुपया तरी पीक विम्यासाठी सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात लावलास का रे?”, असा सवाल मल्हार पाटलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना केला आहे.
ओमराजे निंबाळकरांनी औकात काढली; राणा जगजितसिंह पाटलांनी लायकी सांगत दिलं प्रत्युत्तर
“सर्व खर्च हा राणा दादांनी आपल्या लोकांसाठी केला आहे. तुझी औकात, संस्कार, तुझे राहणी… मुंबईमध्ये पोरींसोबत फिरणे हे काय जनतेला माहित नाही का? जास्त बोलायला लावू नकोस. तुझे सगळी अंडी पिल्ली पाटील कुटुंबाला माहित आहेत. मी माझ्या वडील-आजोबांकडे पाहुन शांत आहे. खानदानाचे संस्कार आहेत म्हणून शांत आहे, पण याद राख जास्त वळवळ केलीस तर तुझी गाठ ही मल्हार पाटलाशी आहे”, असा इशारा मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना दिला आहे.
ADVERTISEMENT