Manoj Jarange मस्साजोगमध्ये जाताच, धनंजय देशमुख धाय मोकलून रडले, जरांगे म्हणाले बदला होणार!

Manoj Jarange: संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये सहा आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. सहाही आरोपी अत्यंत क्रुरपणे संतोष देशमुख यांची कपडे काढून त्यांना मारहाण अमानुष मारहाण करत होते.

Mumbai Tak

मुंबई तक

04 Mar 2025 (अपडेटेड: 04 Mar 2025, 11:03 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"संतोषभैय्यांना हसायला लावणार, बदला घेणार..."

point

मनोज जरांगे मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुख धाय मोकलून रडले

point

मनोज जरांगे यांच्याकडून देशमुख कुटुंबाचं सांत्वन

Santosh Deshmukh Murder Case Updates: राक्षसी कृत्याचे फोटो पाहून, काल संध्याकाळी अक्षरश: महाराष्ट्र हादरला.  बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्या घटनेची संपूर्ण दृष्य सध्या समोर आलेले आहेत. त्यानंतर आता मनोज जरांगे मस्साजोगमध्ये दाखल झाले आहे. काल अनेक माध्यमांशी बोलताना धाय मोकलून रडलेले धनंजय देशमुख आज मनोज जरांगेंच्या खांद्यावर डोकं ठेवून पुन्हा रडले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder : क्रूरतेचा कळस! संतोष देशमुखांची अमानुष हत्या, सर्वात धक्कादायक फोटो आले समोर

काही दिवसांपूर्वी या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचं दावा सीआयडीने चार्जशीटमध्ये केला आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या विकृतीचे फोटो समोर आले आहेत. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या केल्याचं या फोटोंच्या माध्यमातून उघडकीस आलंय. 

मनोज जरांगे यांनी मस्साजोगमध्ये जात अत्यंत आक्रमक होत, संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला होईल असं मनोज जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना सांगतो, धनंजय मुंडे यांना काढून फेका, आमदारकीही काढून घ्या आणि 302 मध्ये घ्या त्यांना. या संपूर्ण प्रकरणाला धनंजय मुंडे जबाबदार आहेत असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. ही टोळी संपवावी लागणार आहे, आपल्या घरातल्या लेकराची क्रूर हत्या केली असती तर कसं वाटलं असतं? असाही सवाल मनोज जरांगे यांनी केला.

हे ही वाचा >>"महाराष्ट्रात गुंडांचं राजकारण, त्या आरोपीला...", कैलास बोराडे मारहाण प्रकरणावरून अंजली दमानीया संतापल्या!

संतोष देशमुख यांचा बदला होणार, एवढं क्रूर मारलंय, त्यांचा बदला होणार, संतोष देशमुख यांना हसायला लावणार, मनोज जरांगे हे मस्साजोगमध्ये गेल्यावर अत्यंत आक्रमक, संतप्त होत बोलत होते. 

    follow whatsapp