इन्स्टाग्रामवर हवा करण्यासाठी पठ्ठ्याने थेट शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारालाच धमकी दिली, प्रकरण काय?

Arjun Khotkar Threat Case : या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, आम्ही धमक्यांना घाबरणार नाही. धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

Mumbai Tak

मुंबई तक

26 Apr 2025 (अपडेटेड: 26 Apr 2025, 12:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांना धमकीचं प्रकरण

point

पोलिसांकडून अल्पवयीन आरोपी ताब्यात

point

ताब्यात घेतलेल्या आरोपीनं काय सांगितलं? वाचा...

Arjun Khotkar threat Case : इन्स्टाग्रामवर एकीकडे चांगला कंटेंट देऊन लाईक्स मिळवणारे कलाकार आहेत. तर दुसरीकडे लाईक्स मिळवण्यासाठी जीवघेणे स्टंट, अश्लील चाळे आणि थिल्लर चाळे करणारे अनेक महाभाग आपण पाहत असतो. पण जालन्यातल्या एकाने थेट सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला धमकी देण्याचा प्रताप केलाय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना मृत्यू झालेल्या आदिल सय्यदच्या कुटुंबाच्या मदतीला धावले DCM शिंदे

थेट शिवसेनेच्या आमदाराला धमकी 

जालना जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलाने इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी आमदार पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस तपासात असं समोर आलं की, अल्पवयीन मुलाने बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून ही धमकी दिली होती.

आरोपी अल्पवयीन मुलगा

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जालना पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, अल्पवयीन मुलाने कबूल केलं की त्यानं सोशल मीडियावर लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे कृत्य केलं होतं.

धमकी देणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर त्याला सूचना देऊन सोडून देण्यात आलंय. पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि इतर लोकांची यात काही भूमिका आहे का हे देखील तपासलं जातंय.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, आम्ही धमक्यांना घाबरणार नाही. धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

विशेष म्हणजे या घटनेमुळे सोशल मीडियाच्या गैरवापराकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत झालंय. काही तरुण लोकप्रियतेसाठी धोकादायक पद्धतीची कामं करताना दिसत आहेत.


 

    follow whatsapp