पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना मृत्यू झालेल्या आदिल सय्यदच्या कुटुंबाच्या मदतीला धावले DCM शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे काश्मीरमध्ये गेल्यावर महाराष्ट्रातील पर्यटकांना भेटले, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  यावेळी पर्यटकांनी आदिलच्या शौर्याची कहाणी सांगितली. त्यावेळी प्रभावित होऊन शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.

Mumbai Tak

मुंबई तक

26 Apr 2025 (अपडेटेड: 26 Apr 2025, 10:18 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे यांची आदिलच्या कुटुंबाला मदत

point

आदिलने पर्यटकांना वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी

point

अतिरेक्यांची बंदूक हिसकावताना आदिललाही गोळी घातली

Eknath Shinde Helps Adil Sayed Family : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला. दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करत असताना 20 वर्षीय स्थानिक तरुण सय्यद आदिल हुसेन शाहने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांचे प्राण वाचवत होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा धाडसाने सामना करताना सय्यद आदिलचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिलच्या धाडसाबद्दल त्याला आदरांजली वाहिली. एकनाथ शिंदे यांनी त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदतही दिली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Pahalgam Attack: गॅसने भरलेले 20-25 सिलेंडर का दिले फेकून? दहशतवादी हल्ल्यातील भयंकर गोष्ट आली समोर

शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सय्यद यांच्या कुटुंबाला ही मदत सुपूर्द केली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आदिलच्या कुटुंबाशी संवाद साधला. तुम्हाला सर्वतोपरी मदत करु असं आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिलं.

पर्यटकांना वाचवताना आदिलने दाखवलं शौर्य

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी, सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावर बसवून घेऊन जायचा. हल्ल्याच्या दिवशी, पर्यटक घोड्यावर स्वार होत असताना, अचानक दहशतवादी दिसले. कोणतीही भीती न बाळगता, आदिलने एका पर्यटकाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि एका दहशतवाद्याकडून रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, दहशतवाद्यांनी त्याच्यावरही गोळीबार केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

पर्यटकांनी शिंदेंना सांगितली आदिलच्या शौर्याची कथा

पहलगाममधील हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार, 23 एप्रिल रोजी रात्री उशिरा श्रीनगरला पोहोचले. विमानतळाजवळील कॅम्पमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना भेटले, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  यावेळी पर्यटकांनी आदिलच्या शौर्याची कहाणी सांगितली. त्यावेळी प्रभावित होऊन शिंदे यांनी आदिलच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.

कुटुंबाशी संवाद, घर बांधण्याचंही आश्वासन

शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सय्यदच्या कुटुंबाला धनादेश सुपूर्द केला. तेव्हा स्थानिक आमदार सय्यद रफिक शाह देखील उपस्थित होते. यादरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, आदिलच्या भावाने उपमुख्यमंत्र्यांना हल्ल्याच्या दिवसाची संपूर्ण घटना, आदिलने दहशतवाद्यांशी कसे लढले, पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला हे सांगितलं.

हे ही वाचा >> Pahalgam Attack: जखमींना पाठीवर घेऊन धावत सुटला..., प्रचंड चर्चेत असलेला सजाद भट्ट आहे तरी कोण?

यावेळी शिंदे म्हणाले, "सय्यद आदिलने ज्या पद्धतीने मानवता आणि शौर्य दाखवलं ते संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. सरकार त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे." सय्यद आदिल यांच्या कुटुंबाचं जीर्ण झालेलं घर पुन्हा बांधण्यासाठी सरकार मदत करेल, असं आश्वासनही शिंदेंनी दिलं.

    follow whatsapp