मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ATS आणि NIA च्या टीमने मुंब्रा येथील रेतीबंदरची पाहणी केली. मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणीच मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता. या ठिकाणी दोन्ही पथकांनी येऊन पाहणी केली. ATS चं पथक संध्याकाळी ६ च्या दरम्यान या ठिकाणी आलं होतं त्यांनी रेतीबंदर या ठिकाणी येऊन पाहणी केली. ATS चं पथक या ठिकाणी आलं त्यांनी या ठिकाणचे काही फोटो काढले. त्यानंतर ते पथक गेलं.
ADVERTISEMENT
त्यानंतर ७.३० ते ८ वाजण्याच्या दरम्यान एनआयएचं पथक या ठिकाणी पोहचली होती. त्यांच्यासोबत चार गाड्या होत्या. एनआयएच्या टीमने घटनास्थळी येऊन काही फोटो काढले तसंच काही मोबाईल व्हीडिओ शूटही केलं. त्यानंतर ५ ते सात मिनिटांनी हे पथकही निघून गेलं. एटीएस किंवा एनआयए यांच्यापैकी कोणत्याही पथकाने सीन रिक्रिएट केला नाही.
मनसुख हिरेन प्रकरण : एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल
काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला एक संशयित स्कॉर्पिओ आढळली होती. या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मागच्या शुक्रवारी या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. सकाळी १० वाजून २५ मिनीटांनी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येखील खाडीतून बाहेर काढण्यात आला. रात्री उशीरा हिरेन यांच्या मृतदेहावर पोस्ट मार्टम पूर्ण करण्यात आलं.
कोण होते मनसुख हिरेन?? त्या दिवशी काय घडलं, जाणून घ्या घटनाक्रम
घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच ४ मार्चला मनसुख हिरेन रात्री ८ वाजून २० मिनीटांनी घराबाहेर पडले. यानंतर रात्रभर मनसुख घरी परतलेच नाही. चिंतेत पडलेल्या परिवारातील सदस्यांनी थोडावेळ वाट पाहण्याचं ठरवलं. परंतू दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ मार्चला दुपारपर्यंत मनसुख यांचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे अखेरीस कुटुंबाने नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याच दिवशी सकाळी सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होता.
ADVERTISEMENT