मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज सोलापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते सोलापुरात जमायला सुरुवात झाली असून सोलापूर जिल्ह्यात आज पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहीते-पाटील, धैर्यशील मोहीते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलिसांनी मध्येच अडवलं आहे. अखेरीस रणजितसिंह मोहीते पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवा केली आहे.
दरम्यान आंदोलनकर्त्यांना सोलापुरात येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी फौजफाटा तैनात केला असून पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, सांगोला या भागांमधून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे. तरीही काही कार्यकर्ते हे कालच सोलापुरात दाखल झाल्यामुळे आज सकाळपासून छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलनकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत या ठिकाणी ३०० कार्यकर्त्यांची फौज जमली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक भागांत नाकाबंदी केली आहे.
असा आहे आजच्या आक्रोश मोर्चासाठी पोलिसांचा बंदोबस्त –
सोलापुरात ८२ ठिकाणी नाकेबंदी
१८०० पोलीस कर्मचारी
२०० पोलीस अधिकारी तैनात
दरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचं सांगत नरेंद्र पाटील यांनी पुढचा मोर्चा हा न सांगता काढू असा इशारा दिला आहे. “राज्यात इतर ठिकाणी आंदोलनं झाली, सोलापुरातही आंदोलनं-मोर्चे निघाले. त्यावेळी त्यांना परवानगी मिळाली पण मराठा समाजाच्या मोर्चाला जाणुनबुजून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पुढचा मोर्चा हा न सांगता काढू”, असा इशारा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
Maratha Reservation: ‘या ठिणगीचा राज्यभर वणवा पसरणार’, भाजप खासदाराचा सरकारला इशारा
ADVERTISEMENT