मुंबई: मुंबईतील गोरेगावमध्ये एका महिलेचा अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून तब्बल 4 लाख रुपये उकळल्याप्रकरणी एका तरुणाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तरुणाने महिलेसोबतचा शारीरिक संबंध प्रस्थापित करताना व्हीडिओ शूट केला होता. यातूनच तो तिला सतत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा महिलेने तरुणाला पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तरुणाने तिचा व्हीडिओ थेट तिच्या पतीलाच पाठवला. या सगळ्या प्रकारानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी थेट दिल्लीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ADVERTISEMENT
पोलिसांनी आरोपीला दिल्लीच्या कमला विहार येथून अटक केली. ज्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. याप्रकरणी कोर्टाने आरोपी तरुणाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमधील एका विवाहित उद्योजक महिलेने आरे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, ती 2016 साली बिहारच्या पटनामध्ये पर्सनालिटी डेव्हलपमेंट सेमिनारला गेली होती. त्याच सेमिनारमध्ये तिची ओळख ही आरोपी कृष्णकांत अखोरी (वय 25 वर्ष) याच्याशी झाली होती. हळूहळू या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
यानंतर दोघे अनेकदा एकमेकांना भेटले आणि एकमेकांसोबत राहत होते. याचवेळी दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. याचवेळी कृष्णकांतने एकदा व्हीडिओही शूट केला. या सगळ्या दरम्यान, महिलेचं तिच्या पतीसोबत पटत नसल्याने ती अनेक दिवस पतीपासून दूर राहत होती.
याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपीने महिलेसोबत मैत्री करुन तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. पण काही वर्षानंतर महिला आणि तिच्या पतीमधील संबंध सुधारले आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले. दुसरीकडे यावेळी आरोपी सातत्याने महिलेला संबंध प्रस्थापित करण्यासाठी दिल्लीला बोलावलं पण महिलेने त्याला अनेकदा नकार दिला होता.
दरम्यान, आरोपीने पहिलेच शूट केलेला व्हीडिओ महिलेच्या पतीला पाठविण्याची धमकी देत महिलेकडून अनेकदा पैसे उकळले. तब्बल 4 लाख रुपये आरोपीने महिलेकडून उकळल्यानंतरही त्याने पैशाची मागणी सुरुच ठेवली. पण महिलेने जेव्हा पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपीने थेट महिलेच्या पतीला तिचा अश्लील पाठविला.
यानंतर महिलेच्या पतीने या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल केली. ज्याआधारे पोलिसांनी कलम 385, 354 (A) अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर गोरेगाव पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला. यावेळी आरोपीला पकडण्यासाठी एक खास टीमही बनविण्यात आली.
या टीमने आरोपी कृष्णकांत याच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध सुरु केला. जेव्हा पोलिसांना आरोपी दिल्लीतील कमला विहारमध्ये असल्याची पक्की माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ दिल्लीत जाऊन त्याला अटक केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणून कोर्टासमोर हजर करण्यात आलं.
नांदेड: धक्कादायक.. दोन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला संशयास्पद स्थितीत, नेमकं काय घडलं?
आता सध्या कोर्टाने आरोपीला कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT