फेसबुकवरील अनोळखी व्यक्तीशी केलेली मैत्री नागपुरमधील एका विवाहीत महिलेला चांगलीच महागात पडली आहे. जरीपटका भागात राहणाऱ्या या पीडित महिलेवर जळगावमधील आरोपी देवेंद्र पवारने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार पीडित विवाहीत महिला, पतीसोबत पटत नसल्यामुळे आपल्या दोन मुलांना घेऊन वेगळी राहत होती. एका खासगी दवाखान्यात ती नर्स म्हणून काम करते. २०१७ साली पीडित महिलेची फेसबूकवर देवेंद्रसोबत ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर पीडित महिलेला आरोपी देवेंद्रला भेटायला जळगावला गेली.
नागपूर : पार्किंगमधली कार बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटलं, अपघातात तरुण गंभीर जखमी
यावेळी देवेंद्रने तिच्यासोबत जवळीक साधत तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. पीडित महिलेचा विश्वास मिळवल्यानंतर देवेंद्रने आपल्या मित्राच्या घरी नेऊन या महिलेवर बलात्कार केला. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तुझ्याशी लग्न करेन असं आश्वासन देवेंद्रने वारंवार या महिलेला दिलं. परंतू कालांतराने देवेंद्र वारंवार या महिलेला भेटणं टाळायला लागला. ज्यानंतर या महिलेने पोलिसांत देवेंद्रविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.
बालपणीचा मित्रच निघाला नराधम; विवाहित शिक्षिकेवर बलात्कार, नागपूरमधली धक्कादायक घटना
ADVERTISEMENT