ADVERTISEMENT
मारुती सुझुकीने आपल्या अनेक गाड्यांमध्ये स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजीची सुविधा दिली आहे.
या गाड्या इतर कारच्या तुलनेत अधिक मायलेज देतात. तसेच प्रदूषण देखील कमी करतात
स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजी कारचं इंजिन हे थोडा वेळ जरी उभी राहिली तरी तिचं इंजिन आपोआप बंद होतं.
यानंतर ऑप्टिमल कंडिशनमध्ये आल्यानंतर या कार सायलेंट पद्धतीने सुरु होता. यामुळे या कारचं मायलेज वाढतं.
चला तर जाणून घेऊयात मारुती सुझुकीच्या अशा काही कारबाबत ज्यांचं मायलेज जास्त आहे.
हायब्रिड टेक्नोलॉजीसह सुसज्ज असलेल्या Baleno या कारचं मायलेज 23.87 किमी प्रति लीटर आहे.
कंपनीची सेडान कार Ciaz च्या म्यॅनुअल ट्रान्समिशनवर 20.65 आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर 20.04 किमी प्रति लीटर मायलेज मिळतं.
याशिवाय मारुतीची सर्वाधिक प्रसिद्ध आणि प्रचंड मागणी असणारी Ertiga कार ही एक लीटर पेट्रोलमध्ये 19.01 किमी, S-Cross 18.55 किमी आणि Vitara Brezza 18.76 किमी मायलेज देते.
ADVERTISEMENT