यवतमाळ: यवतमाळच्या शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीसीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांची निर्घृण हत्त्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले असून रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ADVERTISEMENT
डॉ. अशोक पाल असे प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे नाव असून तो मूळ ठाण्याचा असल्याचं समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तो महाविद्यालयाच्या वाचनालयातून वस्तीगृहाकडे जात असताना त्याच्यावर अज्ञात तरुणांनी धारधार शस्त्राने हल्ला केला.
दरम्यान, अशोक या हल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर अशोक हा बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. दरम्यान, जेव्हा या घटनेबाबत माहिती मिळाली तेव्हा काही लोकांनी अशोकला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
गाडीवरून जाताना धक्का लागल्याचं निमित्त! यवतमाळमधील MBBS विद्यार्थ्याच्या हत्येचं गूढ उलगडलं
दुसरीकडे ही घटना महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना समजताच सर्वांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली. या घटनेनंतर प्रचंड संतापल्याचं यावेळी त्यांनी अधिष्ठाता आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र संतापलेले विद्यार्थी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी ही सुरूच होती.
हत्येमागचं नेमकं कारण काय?
विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या परिसरात यवतमाळ शहरातील गुंडांनी धुमाकूळ घातला होता. तेव्हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी त्यांचा वाद झाला होता. नंतर हे प्रकरण पोलिसात देखील गेलं होतं. मात्र अधिष्ठाता यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याच घटनेत डॉ. अशोक यांची हत्या घडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
लग्न का करुन देत नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या
मात्र, या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या हत्येचा उद्देश समोर येणार. त्यामुळे आता पोलिसांनी या हत्येबाबत तात्काळ चौकशीला सुरुवात केली असून दोन संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. सध्या या दोन्ही संशयितांची कसून तपासणी सुरु असून लवकरच या हत्येचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT