Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, परळीत बंद; सुरेश धस, जरांगेंचे फोटो फाडत राडा

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती पण कोर्टाने पोलीस कोठडी नाकारत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:07 PM • 14 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडवर मकोका, खुनाचा कट रचल्याचा आरोप

point

परळी शहरात तणाव, जमावबंदी लागू

point

वाल्मिक कराडच्या समर्थकांची दादागिरी

संतोष देशमुख प्रकरणात रोज नव्या घडामोडी घडत असून, आज वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला असून, हत्येचा कट रचल्याचा आरोपही एसआयटीकडून ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर परळी शहरात वातावरण चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसात घडलेल्या सर्व घटनांमुळे बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. आज वाल्मिकवर मकोका लावल्याची बातमी शहरात पसरताच वाल्मिकच्या समर्थकांकडून बंद करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडवर संक्रात, 'आका'वर लावला 'मकोका', कोर्टात नेमकं काय घडलं?

परळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाल्मिक कराड समर्थकांची दादागिरी सुरू असून,  कवडगावमध्ये एसटी बस फोडली. त्यानंतर परळी बस डेपोमध्ये सर्व गाड्या सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. 
परळी कवडगाव एसटी बस फोडली. वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून संदीप क्षीरसागर,मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांच्या फोटोला पायाखाली तुडवल्याचा प्रकारही घडला आहे.

हे ही वाचा >> Walmik Karad Mother Protest : "माझ्या लेकावर अन्याय, त्याला मुक्त करा", वाल्मिकच्या आईचं ठिय्या आंदोलन

दरम्यान, आज सकाळपासूनच परळीमध्ये वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून वेगवेगळ्या भागात निदर्शनं केली होती. एका ठिकाणी तर समर्थकांनी थेट टॉवरवर चढून घोषणाबाजी केली. वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई होऊ नये अशी भूमिका या समर्थकांची होती. 

 


 

    follow whatsapp