महिला डॉक्टरच्या बाथरूम आणि बेडरूमध्ये छुपा कॅमेरा लावणारा सहयोगी MD Doctor ला अटक

मुंबई तक

• 12:52 PM • 13 Jul 2021

भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधल्या महिला डॉक्टरांचे रूममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्या प्रतिष्ठीत डॉक्टर आरोपीला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 6 जुलै 2021 ला पुण्यातील कात्रज भागात प्रतिष्ठित भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये महिला डॉक्टरांच्या राहत्या खोल्यांमध्ये कुणीतरी अज्ञात इसमाने बनावट चावीच्या मदतीने लॉक उघडून आत प्रवेश केला आणि रूममधील बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे […]

Mumbaitak
follow google news

भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधल्या महिला डॉक्टरांचे रूममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्या प्रतिष्ठीत डॉक्टर आरोपीला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 6 जुलै 2021 ला पुण्यातील कात्रज भागात प्रतिष्ठित भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये महिला डॉक्टरांच्या राहत्या खोल्यांमध्ये कुणीतरी अज्ञात इसमाने बनावट चावीच्या मदतीने लॉक उघडून आत प्रवेश केला आणि रूममधील बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आणि आता या प्रकरणी एका MD डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकांचे अधिकारी नितीन शिंदे आणि त्याचा स्टाफ यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना डॉ. सुजित जगताप यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले आणि त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने त्याचे नाव आणि पत्ता डॉ सुजित आबाजी जगताप (वय 42 वर्ष राहाणार, सिंहगड रोड, पुणे) असे सांगितले आणि त्यानेच सदरचा छुपा कॅमेरा लावल्याचे कबुल केलं. त्यानंतर या डॉक्टरला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या डॉक्टरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे शहरातील महिला डॉक्टरच्या सर्विस क्वार्टरमध्ये स्पाय कॅमेरा बसवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा कॅमेरा महिला डॉक्टरच्या खोलीतील बेडरुम आणि बाथरुममध्ये बसवण्यात आला होता. पीडित महिला डॉक्टर या खोलीत आपल्या आणखी एका महिला सहकाऱ्यासोबत राहते. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयातलं काम संपवून ही महिला डॉक्टर आपल्या खोलीवर फ्रेश होण्यासाठी आली होती. यावेळी तिने बाथरुमचा लाईट लावण्याचा प्रयत्न केला असता ती सुरु झाली नाही. बेडरुमची लाईटही सुरु होत नसल्यामुळे या महिला डॉक्टरने इलेक्ट्रीशिअनला बोलावलं. इलेक्ट्रिशिअन दुरुस्तीसाठी आल्यानंतर त्याने बाथरुममधील बल्बचे होल्डर उघडले असता त्यात स्पाय कॅमेरा, मेमरी कार्ड आणि बॅकअप आढळला. यानंतर बेडरुमच्या बल्बमधील होल्डरमध्येही अशाच पद्धतीने स्पाय कॅमेरा आढळून आला होता. आता या प्रकऱणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

    follow whatsapp