मेडिकलची विद्यार्थिनी सदिच्छा साने मुंबईतल्या बांद्रा भागातून महिन्याभरापूर्वी बेपत्ता झाली. ती बेपत्ता होऊनही तिचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. 29 नोव्हेंबरला सदीच्छा माने मुंबईतल्या ब्रांदा भागातून बेपत्ता झाली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतल्या पालघरजवळ असणाऱ्या बोईसर या ठिकाणी राहणारी मेडिकल स्टुडंट सदिच्छा साने बेपत्ता झाली आहे. तिला बेपत्ता होऊन एक महिना उलटला आहे. मात्र तिचा काहीही शोध लागू शकलेला नाही. तसंच तिच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. अशात अभिनेत्री हेमांगी कवीने यासंदर्भात पोस्ट लिहून चिंता व्यक्त केली आहे.
हेमांगी कवीची ‘चाळीशी’तील पोस्ट चर्चेत; म्हणते ‘खोटी वाटणारी गोष्ट खरी ठरली की राव’
काय आहे अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट?
हेमांगनी सदिच्छाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर तिने ही माहितीही लिहीली आहे.
ही स्वदीछा साने. वय वर्ष 22.
उंची ५.३”. वर्ण गोरा. बांधा सडपातळ
राहणार बोईसर.
29 नोव्हेंबर पासून बेपत्ता आहे.
Bandra station वरून.
एक महिना झालाय. अजूनही तिचा पत्ता नाही.
संपर्क : मनीष साने – 9209222253 (वडील)
संस्कार साने – 8446694666 (भाऊ)
पोलीस तपास करत आहेत. आपण ही एक सुजाण नागरिक म्हणून जितकी शक्य होईल तितकी साने कुटुंबीयांना मदत करूया!
Please Share
#mumbaipolice #CrimeBranch
सदिच्छा सानेचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो आहे. त्याचप्रमाणे बांद्रा परिसरात तिचे फोटोही लावण्यात आले आहेत. सदिच्छाने तिला बॉयफ्रेंड आहे असं सांगितल्याचा दावा तिच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या तरूणाने केला आहे. सदिच्छा सानेसोबत मितू सिंह या तरूणाने सेल्फी काढला होता. मितू सिंह याने केलेला हा दावा सदिच्छाच्या कुटुंबीयांनी खोडून काढला आहे.
सदीच्छाच्या कुटुंबीयांनी काय म्हटलं आहे?
दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या प्रीलिमच्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नसून तिचा अचानक फोन बंद आला असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. सदिच्छाच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे वांद्रे बॅंडस्टॅंड येथे दाखवण्यात येत आहे. त्या ठिकाणी तिला पाहणारा शेवटचा एक जीवरक्षक असल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.
सदिच्छाचं अपहरण?
शालेय शिक्षणापासून सदिच्छा नेहमीच टॉपर राहिली असून तिला मिळणाऱ्या स्कॉलरशिप आणि बक्षीस यांच्यातच तिचा शिक्षणाचा खर्च भागत होता. सदिच्छा नेहमीच कुटुंबाचा आधार होती. मात्र कुटुंबाचा आधारच मागील महिन्याभरापासून बेपत्ता असल्याने साने कुटुंबीय त्रस्त झालं आहे. सदिच्छाचं शेवटचं लोकेशन हे बांद्रा बॅंडस्टॅंड येथे दाखवत असून तिचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी योग्य दखल घेऊन सदिच्छाचा शोध घ्यावा, अशी मागणी सदिच्छाच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT